Priya Bapat : प्रिया बापटने सोशल मीडियावर चाहत्यांना घातली भूरळ
Priya Bapat : मराठीतील सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट मराठीसोबत हिंदीतही आपला दबदबा कायम ठेवला आहे. नुकत्याच तिच्या दोन वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्या होत्या. मराठीतील 'आणि काय हवं'... या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनमधून तर 'सिटी ऑफ ड्रीम सीझनच्या' दुसऱ्या सीझनमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रिया बापट तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमीच सक्रिय असते. तिची आणि उमेशची जोडी ऑनस्क्रीन जितकी प्रेक्षकांना भावते. तितकीच ती ऑफ स्क्रिनदेखील प्रेक्षकांना आवडते.
प्रिया तिची प्रत्येक भूमिका विचारपूर्वक निवडत असते. तिने भूमिका निवडल्यानंतर त्या भूमिकेसाठी ती प्रचंड अभ्यास करत असते. भूमिकेसाठी गरजेच्या असणाऱ्या गोष्टीदेखील ती करत असते. वजनदार चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी तिने खास वजन वाढवले होते.
'आणि काय हवं'च्या तिसऱ्या सीझननंतर आणि 'सिटी ऑफ ड्रीम'च्या दुसऱ्या सीझननंतर 'ती पुन्हा एकदा' आणि 'काय हवं' च्या चौथ्या सीझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकते.
प्रियाचे फोटोशूट सोशल मीडियावर नेहमीच गाजत असते. बोल्ड अंदाजात, कधी वेस्टर्न साडीमध्ये तर कधी मराठमोळ्या साडीत प्रियाचे फोटो शूटदेखील चाहत्यांना भूरळ पाडत असतात.
प्रियाने शाळेत असल्यापासूनच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. बालमोहन शाळेत असतानाच तिने अभिनयाचा प्रवास सुरू केला होता. दरम्यान तिने मालिकेतदेखील पदार्पण केले. त्यानंतर सिनेमे, वेब मालिकांमधून तिच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
प्रियाचे हसतमुख व्यक्तीमत्तव नेहमीच चाहत्यांना भूरळ घालत असते. तिची हसरी अदा बघण्यासाठी तिचा चाहतावर्ग नेहमीच उत्सुक असतो. प्रिया ही नेहमीच हसतमुख असते. ती फिटनेसफ्रिक असली तरीही तिची खवय्येगिरी सुरुच असते. नवनवीन पदार्थ बनवून ते सोशल मीडियावर शेअर करताना ती दिसून येते.