या सुखांनो या ते स्वामिनी, ऐश्वर्या नारकरच्या 'या' मालिकांना मिळाली प्रेक्षकांची पसंती

ऐश्वर्यानं कोणकोणत्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे? याबाबत जाणून घेऊयात...

(Aishwarya Narkar/Instagram)

1/9
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. ऐश्वर्या नारकर ही मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते.
2/9
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर ही मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध जोडी आहे. ऐश्वर्या आणि अविनाश या कपलच्या सोशल मीडियावरील फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते.
3/9
लग्नापूर्वी ऐश्वर्याचं नाव काय होतं? ऐश्वर्यानं कोणकोणत्या मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे? याबाबत जाणून घेऊयात
4/9
ऐश्वर्या नारकरचं लग्नापूर्वी पल्लवी अठले असं नाव होतं.
5/9
ऐश्वर्यानं अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. या सुखांनो या, स्वामिनी, लेक माझी लाडकी, श्रीमंतघरची सून या मालिकांमधील ऐश्वर्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. ये प्यार ना होगा काम,घर की लक्ष्मी बेटियां या हिंदी मालिकांमध्ये तिनं काम केलं.
6/9
ऐश्वर्या ही नाटकांमधून आणि चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येते. गंध निशिगंधाचा, सोयरे सकळ,सोनपंखी या नाटकांमध्ये ऐश्वर्यानं काम केलं.
7/9
तुच माझी भाग्य लक्ष्मी,कधी आचानक, अंक गणित आनंदाचे या मराठी चित्रपटांमधून ऐश्वर्या प्रेक्षकांच्या भेटीस आली.
8/9
ऐश्वर्या ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. तिला इन्स्टाग्रामवर 132k फॉलोवर्स आहेत.
9/9
ऐश्वर्या ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते.
Sponsored Links by Taboola