Adipurush : रिलीजच्या नवव्या दिवशी 'आदिपुरुष'ने केली 5.25 कोटींची कमाई
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) 'आदिपुरुष' (Adipurush) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. पण बॉक्स ऑफिसवर मात्र या सिनेमाची यशस्वी दौघदौड सुरू आहे.
'आदिपुरुष' हा सिनेमा 16 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
रिलीजच्या नऊ दिवसांत बॉक्स ऑफिसवर या सिनेमाचाच बोलबाला पाहायला मिळाला आहे.
रिलीजच्या नऊ दिवसांत या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.
'आदिपुरुष' सिनेमाने रिलीजच्या नवव्या दिवशी 5.25 कोटींची कमाई केली आहे.
'आदिपुरुष' सिनेमाने रिलीजच्या नऊ दिवसांत 268.55 कोटींचा गल्ला जमवला आहे.
जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 400 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
500 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती.
रामायणावर आधारित असलेल्या 'आदिपुरुष' सिनेमातील संवाद, व्हीएफएक्स अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना खटकल्या आहेत. वेगवेगळ्या कारणाने या सिनेमाला ट्रोल केलं जात आहे.