PHOTO : ‘वहिनीसाहेबां’चं दमदार कमबॅक, नव्या मालिकेतून धनश्री काडगांवकर येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

Dhanashri Kadgaonkar

1/6
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगांवकर. या मालिकेत तिने ‘वहिनीसाहेब’ हे पात्र साकारले होते.
2/6
मालिकेदरम्यान गर्भवती असल्याने धनश्रीने या मालिकेला अलविदा केला होता. आता धनश्री आई झाली असून, ती लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.
3/6
नव्या मालिकेतून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील आगामी मालिका ‘तू चाल पुढं’मध्ये (Tu Chal Pudha) ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
4/6
नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या मालिकेची गोष्ट आहे एका गृहिणीने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांची.
5/6
एकत्र कुटुंब असलेल्या या घरी अश्विनीला देखील त्यांच्या नवीन घरासाठी खारीचा वाटा देण्याची इच्छा असते, हे या प्रोमो मधून झळकते.
6/6
या मालिकेत अभिनेत्री दीपा परब सोबतच ‘तुझ्यात जीव रंगला’मधील वाहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसतेय. (Photo : @ kadgaonkar_dhanashri/IG)
Sponsored Links by Taboola