Actress Debina Bonnerjee Wanted Fourth Marriage: तिनदा लग्न करुनही 'या' टेलिव्हिजन अभिनेत्रीचं मन काही भरेना; आता मुलांसमोरच बांधणार चौथ्यांदा लग्नगाठ

Television Actress Debina Bonnerjee Wanted Fourth Marriage: बॉलिवूड असो किंवा टेलिव्हिजन इंडस्ट्री, असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी एकापेक्षा जास्त वेळा लग्न केलंय.

Continues below advertisement

Television Actress Debina Bonnerjee Wanted Fourth Marriage

Continues below advertisement
1/8
अशीच एक सुंदरी म्हणजे, देबिना बॅनर्जी, जिनं एकदा नाही, दोनदा नाहीतर तब्बल तीन वेळा लग्न केलं आहे. आणि आतातर ती चौथ्यांदा लग्नगाठ बांधायला तयार आहे.
2/8
देबिना बॅनर्जी, जेवढी तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते, तेवढीच ती तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. टेलिव्हिजन विश्वातल्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी देबिना सध्या तिच्या चौथ्या लग्नामुळे चर्चेत आहे.
3/8
देबिना बॅनर्जीनं अभिनेता गुरमीत चौधरीशी लग्न केलंय. हे दोघेही इंडस्ट्रीतील सर्वात क्युट कपल्सपैकी एक आहेत. सध्या, देबिना आणि गुरमीत 'लाफ्टर शेफ सीझन 3'मध्ये दिसत आहेत.
4/8
देबिना आणि गुरमीत अलीकडेच एल्विश यादवच्या पॉडकास्टवर आलेले, तिथे त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल अनेक गमतीशीर खुलासे केले.
5/8
देबिना आणि गुरमीत यांनी यापूर्वी अनेकदा खुलासा केलाय की, त्यांची तीन लग्न झालीत. 2006, 2011 आणि 2021 मध्ये, या जोडप्यानं आता पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Continues below advertisement
6/8
देबिना म्हणाली की, "एकदाच लग्न का करायचं? लग्न काही पार्ट्समध्ये झाली पाहिजेत. पण ते जितकं भव्य असायला हवं होतं तितकं भव्य झालं नाही..."
7/8
गुरमीतनं उत्तर दिलं की, "त्यांनी चौथ्यांदा लग्न वाचवलंय..." देबिना पुढे म्हणाली की, "त्यांना लॉस एंजेलिसमध्ये लग्न हवं आहे. त्यांना व्हाईट वेडिंग आवडतं..."
8/8
यावर गुरमीतनं आश्चर्य व्यक्त केलं आणि विचारलं की, "किती लग्न करणारेस? एकदाच खर्च करुन टाकुयात..." देबिनानं उत्तर दिलं की, "आमच्या लग्नात कोणताही खर्च झाला नाही..." देबीना आणि गुरमीत म्हणाले की, आम्ही चौथं लग्न केलं तर, आमची मुलंही आमचं लग्न पाहतील... एल्विशनं यावर म्हटलं की, "तुमचं लग्न कुंभ मेळ्यासारखं आहे, दर 12 वर्षांनी येतंय..."
Sponsored Links by Taboola