Aai Kuthe Kay Karte : नेहमी साडीमध्ये दिसणारी ‘अरु’ आता चक्क पंजाबी ड्रेसमध्ये दिसणार; अरुंधतीचा मेकओव्हर होणार?
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका प्रेक्षकांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग बनली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. मालिकेतील कौटुंबिक सोहळे आणि जिव्हाळा हा प्रेक्षकांच्या मनाला भावाला आहे.
या मालिकेत ‘आई’ अर्थात ‘अरुंधती’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरवर देखील कौतुकाचा वर्षाव होत आहे.
लवकरच या मालिकेत ‘अरुंधती’चा बदललेला अवतार पाहायला मिळणार असल्याचे कळते आहे.
नेहमी साडीमध्ये दिसणारी ‘अरु’ आता चक्क पंजाबी ड्रेसमध्ये दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे. अद्याप यावर वाहिनीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
मात्र, ‘आई’चा लूक बदलणार असल्याचे कळताच प्रेक्षक देखील आनंदित झाले आहेत.
लवकरच मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात येणारं एक सकारात्मक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आजवर अरुंधतीने आपली स्वप्न, आवडीनिवडी बाजूला सारुन कुटुंबाला सर्वस्व मानलं. मात्र आता अरुंधतीच्या स्वप्नांना नवी भरारी मिळणार आहे. गाण्याची आवड असणारी अरुंधती आता मालिकेत पार्श्वगायिका होणार आहे. आशुतोषच्या मदतीने ती तिच्या आयुष्यातलं पहिलं गाणं रेकॉर्ड करणार आहे. मालिकेतला हा गाण्याचा प्रसंग सुरेश वाडकर यांच्या ‘आजिवासन’ स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे.