Aai Kuthe Kay Karte : आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधतीच्या स्वप्नांना मिळणार नवी भरारी
अरुंधतीच्या स्वप्नांना नवी भरारी मिळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगाण्याची आवड असणारी अरुंधती आता मालिकेत पार्श्वगायिका होणार आहे.
आशुतोषच्या मदतीने अरुंधती तिच्या आयुष्यातलं पहिलं गाणं रेकॉर्ड करणार आहे.
मालिकेतला हा गाण्याचा प्रसंग सुरेश वाडकर यांच्या आजिवासन स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आला.
मालिकेतल्या या नव्या वळणाविषयी सांगताना मधुराणी म्हणाल्या, 'खूप छान वाटतं आहे. मला जेव्हा १० वर्षाच्या मोठ्या गॅप नंतर आई कुठे काय करते मालिकेत काम करण्याची संधी मिळाली तिच आनंदाची भावना अरुंधती आता जेव्हा तिचं पाहिलं गाणं रेकॉर्ड करतेय तेव्हा आहे. '
पुढे त्यांनी सांगितलं, ' आजिवासन स्टुडिओ मध्ये येता क्षणीच जुन्या आठवणी जाग्या झाल्या. १२ वर्षांपूर्वी सुंदर माझं घर सिनेमाचं मी संगीत दिग्दर्शन केलं होतं तेव्हा रोज यायचे.'
'आज या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा योग जुळून आला. मी या वास्तु मध्ये पाय ठेवताच खुप भरून आलं. खूप आठवणी ताज्या झाल्या. आई कुठे काय करते मालिकेत आता अरुंधतीचा नवा प्रवास सुरु होतोय तो कसा असेल हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.'', असं ही मधुराणी यांनी सांगितलं.