PHOTO : तेजस्विनी पंडितच्या घरी आली खास पाहुणी, पोस्ट लिहित अभिनेत्री म्हणते...
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतेय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतेजस्विनीनं अनेक मराठी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
तेजस्विनी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असून वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
आता तेजस्विनी चर्चेत आलीये ती तिच्या घरी आलेल्या नव्या पाहुणीमुळे...
तेजस्विनी पंडितच्या घरी नुकतीच एक नवी खास पाहुणी आली आहे. या खास पाहुणीला पाहून चाहते देखील आनंदित झाले आहेत.
तेजस्विनीने स्वतःसाठी एक कार खरेदी केली आहे. याची माहिती तिने स्वतः सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.
‘माझ्या आयुष्यातला हा आनंदाचा क्षण तुमच्याबरोबर share करतेय...’, असे म्हणत तिने ही पोस्ट शेअर केली आहे.
‘आजपर्यंत खूप प्रवास केला... पण एक मात्र पक्कं ठरलंय माझं..आता नुसता प्रवास नाही करायचा ..आता प्रवासाची मज्जा लुटायची...’, असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. (Photo:@tejaswini_pandit/IG)