9 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याची नवरी होणार अभिनेत्री? 2026 मध्ये लग्न करणार? म्हणाली, ‘मुलं…’
ती गेल्या दीर्घकाळापासून करण कुंद्राला डेट करत आहे. तिच्या लव्ह लाइफमुळे बरीच प्रसिद्धी मिळवत असते. चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत
Continues below advertisement
Tejaswi Prakash
Continues below advertisement
1/9
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी प्रकाश पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
2/9
गेल्या काही वर्षांपासून करण कुंद्रासोबतच्या नात्यामुळे ती सतत चर्चेत असते. ‘बिग बॉस’नंतर दोघांची जोडी प्रेक्षकांची आवडती ठरली असून, त्यांच्या लग्नाबाबत चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
3/9
तेजस्वी आणि करणच्या लग्नाच्या चर्चा यापूर्वीही अनेकदा रंगल्या आहेत. मात्र, प्रत्येक वेळी या अफवांवर दोघांनीही ठोस उत्तर देण्याचे टाळले किंवा स्पष्ट नकार दिला.
4/9
आता मात्र, तेजस्वीने स्वतः या विषयावर सूचक प्रतिक्रिया दिल्याने चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
5/9
अलीकडेच अभिनेत्री भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाच्या पॉडकास्टमध्ये तेजस्वी सहभागी झाली होती. या संवादादरम्यान, भारती आणि हर्षने थेट प्रश्न विचारत, “लग्न कधी करणार? २०२६ मध्ये लग्न होणार का?” अशी विचारणा केली.
Continues below advertisement
6/9
यावर तेजस्वीने हसत उत्तर दिले आणि सांगितले की, सध्या या विषयावर चर्चा सुरू आहे. “हो, असं बोललं जातंय. आम्ही याबाबत बोलतोय, पण पुढे काय होतं ते पाहू,” असं ती म्हणाली.
7/9
तेजस्वीच्या या वक्तव्यानंतर २०२६ मध्ये ती आणि करण लग्नबंधनात अडकू शकतात, असा अंदाज चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे.
8/9
जरी तिने ठाम घोषणा केली नसली, तरी तिच्या शब्दांमधून लग्नाच्या शक्यतेला दुजोरा मिळतोय, असंच चित्र आहे.
9/9
पुढे बोलताना तेजस्वीने तिच्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणांबाबतही मनमोकळेपणाने सांगितले. लग्न महत्त्वाचं आहेच, पण भविष्यात मुलं होणं हा क्षण तिच्यासाठी सर्वात मोठा आनंद देणारा असेल, असं तिने स्पष्ट केलं.
Published at : 31 Dec 2025 05:33 PM (IST)