Entertainment: लग्नाच्या गजबजलेल्या शूटिंग सेटवरून तेजश्री प्रधानची थेट कर्करोग रुग्णालयात भेट!

Entertainment: मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये ‘ओजस्य’ या नव्या आरोग्य उपक्रमाचे उद्घाटन लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या हस्ते संपन्न झाले.

Continues below advertisement

तेजश्री प्रधान

Continues below advertisement
1/5
‘वीण दोघातलीही ही तुटेना’ या मालिकेत नुकताच लग्नाचा प्रसंग शूट करूनही तेजश्रीने वेळ काढत या सामाजिक उपक्रमात उत्साहाने सहभागी झाल्या.महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, मानसिक आरोग्याची जाणीव वाढवणे आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांवर मार्गदर्शन करणे हे ‘ओजस्य’चे मुख्य उद्दिष्ट आहे.
2/5
उद्घाटनावेळी तेजश्री प्रधान म्हणाली, “महिलांचे आरोग्य मजबूत असेल, तर घरातील प्रत्येक जण निरोगी राहतो. ‘ओजस्य’सारख्या उपक्रमांमुळे महिलांना स्वतःकडे लक्ष देण्याची आणि वेळेवर तपासणी करण्याची प्रेरणा मिळते.”या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते तसेच आरोग्य क्षेत्रातील विविध प्रतिनिधी सहभागी झाले होते.
3/5
कर्करोगातून बाहेर पडलेल्या महिलांसाठी मानसिक आणि सामाजिक आधाराची गरज, तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्यांचे महत्त्व यावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावर नवनवीन कर्करोग उपचार सुविधांचेही सादरीकरण करण्यात आले. फोर्टिसचे वरिष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. अमोल आखाडे यांनी सांगितले, “‘ओजस्य’चा प्रमुख हेतू म्हणजे वेळेवर तपासणीचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे. जागरूकता वाढली तर अनेक आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य होते.”
4/5
तर सुविधा संचालक डॉ. विशाल बेरी म्हणाले, “ओजस्य हा फक्त उपचारांचा उपक्रम नसून शरीर, मन आणि समाज या तिन्ही स्तरांवर आरोग्य समजून घेण्यासाठी एक अद्ययावत व्यासपीठ ठरेल.” ‘ओजस्य’ अंतर्गत दर तीन महिन्यांनी विशेष आरोग्य कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
5/5
यात कर्करोग प्रतिबंध, हार्मोनल संतुलन, ताण-तणाव व्यवस्थापन, पोषण, मानसिक स्वास्थ्य आणि सर्वायव्हरशिप यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन दिले जाईल.महिलांच्या सर्वांगीण आरोग्याच्या दिशेने फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंडचा हा उपक्रम नक्कीच एक प्रेरणादायी पुढाकार ठरत आहे.
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola