Tara Sutaria : तारा सुतारियाचा पारंपारिक लूक, दिसतेय अप्सरेसारखी सुंदर!
अभिनेत्री तारा सुतारिया आणि अभिनेता अहान शेट्टी आगामी 'तडप' चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. सध्या तडप चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअलीकडेच तारा सुतारियाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये पारंपारिक लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
फोटोमध्ये तारा सुतारिया तिच्या कपाळावर काळी टिकली आणि केसात लाल गुलाब घातलेला दिसत आहे
तारा सुतारियाने स्टुडंट ऑफ द इयर 2 मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तारासोबत टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडेही दिसले होते. हा चित्रपट काही विशेष करू शकला नाही पण ताराचा अभिनय मात्र सर्वांच्या पसंतीस उतरला.
चित्रपटांव्यतिरिक्त तारा सुतारिया सध्या बॉयफ्रेंड आदर जैनसोबतच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या आधी सात फेरे घेणार आहे.
तारा सुतारियाचा आगामी चित्रपट 'तडप' 3 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.