26व्या वर्षी अभिनेत्रीनं आयुष्याचा दोर का कापला? 'त्या' नोटमधून तरूणीनं व्यथा मांडली; आईनं सगळंच सांगितलं

Tragic Death of Actress Nandini CM: तामिळ अभिनेत्री नंदिनी सीएमचा मृतदेह पीजी निवासस्थानी आढळ्यामुळे खळबळ.

Continues below advertisement

Tragic Death of Actress Nandini CM

Continues below advertisement
1/10
तामिळ टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री नंदिनी सीएम (वय वर्ष 26) हिचा पेइंग गेस्ट निवासस्थानी मृतदेह आढळला. यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत खळबळ उडाली.
2/10
अभिनेत्रीने मृत्यूपूर्वी एक सुसाईड नोट देखील लिहिली होती. तिनं या सुसाईड नोटमध्ये अभिनय क्षेत्र सोडून सरकारी नोकरी करण्यास दबाव टाकण्यात येत असल्याचं नमूद केलं. मात्र, याची अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
3/10
या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, मुलीच्या मृत्यूनंतर नंदिनी सीएम हिच्या आईनं ह्रदयद्रावक विधान केलं आहे.
4/10
"मी माझ्या मुलीला वाघीण म्हणायची. तिला सरकारी नोकरी करण्यासाठी दबाव टाकण्यात येत नव्हता. दोन वर्षांपूर्वीच तिच्या वडिलांनी तिला सरकारी नोकरी करायला सांगणं सोडून दिले होते".
5/10
"गेल्या 20 दिवसांपासून ती माझ्याशी बोलत नव्हती. तिला खूप राग होता. तिने अत्यंत चुकीचं पाऊल उचललं आहे", असं नंदिनीची आई, महिला शिक्षक बसवराजेश्वरी म्हणाली.
Continues below advertisement
6/10
"माझी मुलगी मेहनती होती. तिनं अभ्यासातही हुशार होती. बल्लारीमध्ये पीयूसी पूर्ण केल्यानंतर, तिनं बंगळूरूच्या हेसरघट्टा येथील अभियांत्रिका महाविद्यालयात शिक्षण घेत होती".
7/10
"बंगळूरूमध्ये असताना तिने सांगितलं होतं की, तिला अभिनयाचा कोर्स करायचा आहे. मी त्याला विरोध केला नाही. मी एक महिला शिक्षक आहे आणि माझे पती देखील शिक्षक होते. पतीच्या निधनानंतर तिला सरकारी नोकरी करण्याचा सल्ला देत होते. परंतु, तिने नकार दिला. आम्ही त्यानंतर हा विषय सोडून दिला होता".
8/10
"नंतर तिनं स्वत: नोकरीचा विचार केला होता. काही दिवसांनंतर तिचा फोन आला. तेव्हा तिने मालिकांमध्ये चांगल्या संधी मिळत असल्याचं तिनं सांगितलं".
9/10
तिला सरकारी नोकरी करायची नव्हती. माझी मुलगी खूप रागीट होती. पण तिच्या निर्णयांचा आम्ही कधीही विरोध केलेला नाही", असं अभिनेत्रीची आई म्हणाली.
10/10
"माझी धाकटी मुलगी म्हैसूरला परिक्षेसाठी गेली होती. तेव्हा नंदिनीनं आपल्या आयुष्याचा दोर कापला. मला तिच्या करिअरची भविष्याची काळजी होती", असं नंदिनीची आई म्हणाली.
Sponsored Links by Taboola