In pics | लक्ष वेधून गेली 'या' जोड्यांची 'ब्रेक अप के बाद'वाली केमिस्ट्री
रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण हे दोघंही त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात रिलेशनशिपमध्ये होते. पण, त्यांच्या नात्यात काही कारणास्तव दुरावा आला. असं असूनही मैत्रीच्या नात्यात मात्र दुरावा आला नाही. ब्रेकअपनंतर ही जोडी, 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातून झळकली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीप्रमाणेच त्यांची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही चर्चेचा विषय ठरली होती. नातं, रिलेशनशिप आणि दुराव्यानंतर अनेक वर्षांनी ही जोडी 'कलंक' या चित्रपटातून झळकली होती.
शो मस्ट गो ऑन... असं म्हणत कलाविश्वाच्या पटलावर सुरु असणारा हा खेळ कित्येक वर्षांपासून सुरु आहे. कितीही प्रसंग, अडीअडचणी, आव्हानं समोर आली तरीही त्यावर मात करत, प्रसंगी काही काळासाठी त्यांच्यापुढं हतबल होत पण, त्यानंतर लगेचच नव्या जोमानं कामाला लागत कलाकार मंडळींनी या विश्वाचा झगमगाट कायम ठेवला आहे. अशा या विश्वात अनेक अभिनेते, अभिनेत्रींची नाती बहरली आणि काही नात्यांना तडाही गेला. पण, कामाप्रतीची समर्पकता आणि कलेवरच्या प्रेमापोटी ही कलाकार मंडळी त्यांच्या नात्यात दुरावा आल्यानंतरही रुपेरी पडद्यावर एकत्र दिसली. यातील एक जोडी म्हणजे सलमान खान आणि कतरिना कैफ. जवळपास 16 वर्षांपासून या कलाकारांची मैत्री आहे. कलाविश्वातील तथाकथित सेलिब्रिटी कपल म्हणून या जोडीकडे पाहिलं गेलं होतं. असं म्हटलं जातं की त्यांचं नातं बदललं असलं तरीही त्यांनी 'टायगर जिंदा है' या चित्रपटात काम केलं होतं.
अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अभिनेत्री करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचं नातं दुरावलं आणि चाहत्यांसाठी हा एक धक्काच होता. विभक्त झाल्यानंतर खासगी आयुष्यात त्यांनी आपल्या वाटा निवडल्या. ज्यानंतर ते 'उडता पंजाब' या चित्रपटातून झळकले होते.
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या नात्यानंही कलाविश्वात सर्वांचं लक्ष वेधलं होतं. पण, ही जोडी अखेर वेगळी झाली आणि चाहत्यांच्याही भुवया उंचावल्या. पण, ब्रेकअपनंतरही ही जोडी 'जग्गा जासूस' या चित्रपटातून झळकली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -