'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील अजून एक कलाकार मालिका सोडण्याच्या उंबरठ्यावर?

गेल्या 16 वर्षांपासून सुरु असणारी तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या काही वर्षांपासून वादात असल्या कारणाने जास्त चर्चेत आली आहे.

Taarak Mehta Ka oolta Chashma

1/8
मागील काही वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत काम करणारे कलाकार शो सोडून जात आहेत. त्यात आणखी एक कलाकार शो सोडण्याच्या तयारीत आहे.
2/8
मीडिया रिपोर्टनुसार, जेठालाल आणि असित मोदी यांच्यात मोठा वाद झाल्याची घटना समोर आली आहे.
3/8
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील जेठालाल (दिलीप जोशी) आणि निर्माते असित मोदी यांच्यात भांडण झाल्याची बातमी समोर आली.
4/8
मीडिया रिपोर्टनुसार जेठालाल यांना काही दिवसांची सुट्टी हवी होती परंतु असित मोदी यांनी हे टाळलं त्यामुळे त्यांच्यात वादावादी झाली.
5/8
त्यानंतर जेठालालने असित मोदी यांची कॉलर पकडून शो सोडण्याची धमकी दिली.
6/8
मिळालेल्या माहितीनुसार, गोलीची भूमिका साकारणार कुश शाह याच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी ही घटना घडली.
7/8
मालिकेत काम करणारे अभिनेता आत्माराम तुकाराम भिडेने (मंदार चांदवडकर) ही केवळ अफवा आहे आणि आम्ही सर्वजण अगदी शांततेने, आनंदाने शूटिंग करत आहोत असे सांगितले आहे.
8/8
'या गोष्टी निव्वळ अफवा आहे, तसं काही नाही' असं अभिनेता चंपकलाल म्हणजेच जेठालालचे वडील (अमित भट्ट) यांनी सांगितले आहे.
Sponsored Links by Taboola