Sushmita Sen : 'या' कारणामुळे सुष्मिताने घेतला मोठा ब्रेक; पाहा फोटो
Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनकडे (Sushmita Sen) जवळपास 10 वर्षांपासून कोणतेही काम नव्हते आणि तिने यामागचे सर्वात मोठे कारणही नुकतेच स्पष्ट केले आहे.(photo: sushmitasen47/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर चित्रपट विश्वात आलेल्या सुष्मिता सेनसाठी हे स्थान मिळवणे इतके सोपे नव्हते. (photo: sushmitasen47/ig)
मात्र, हळूहळू आपल्या अभिनयाने तिने चित्रपट समीक्षकांची मने तर जिंकलीच, पण प्रेक्षकांच्या हृदयातही विशेष स्थान निर्माण केले. (photo: sushmitasen47/ig)
मात्र, एक वेळ अशी आली होती, जेव्हा सुष्मिताला हवे तसे काम मिळाले नाही आणि या काळात तिने तब्बल 10 वर्षांचा मोठा गॅप घेतला. (photo: sushmitasen47/ig)
अनेक वर्षे अभिनय जगतापासून दूर राहिल्यानंतर सुष्मिताने पुनरागमन केले आणि त्यानंतर वेब सिरीजमधून तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (photo: sushmitasen47/ig)
चित्रपट समीक्षक सुचित्रा त्यागी यांच्याशी झालेल्या संभाषणात सुष्मिता सेनने यामागची कथा सांगितली. अभिनेत्री म्हणाली, 'माझ्या मते, 10 वर्षांच्या गॅपमुळे मला माझ्या आयुष्यात कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे हे ठरवता आले. यामुळे मला कळले की, मी काय करावे आणि काय करू नये? मेनस्ट्रीम सिनेमात मला जे काम करायचं होतं ते मिळत नव्हतं. यामुळे मी थांबणं योग्य समजलं आणि वाट पाहिली.’ (photo: sushmitasen47/ig)
आपला हा मुद्दा पूर्ण करताना सुष्मिता सेन पुढे म्हणाली की, त्या काळात लोकांचा तिच्याशी फारसा संपर्क नव्हता, त्यामुळे तिला असे दिवस पहावे लागले. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, 'त्यावेळी माझी मानसिकता काय होती हे मला माहीत नाही किंवा कदाचित मी स्वत:ला योग्यरित्या सादर करू शकले नाही. मी यात कधीच चांगले नव्हते. मी नेटवर्किंगमध्ये कमी पडले. याच गोष्टी माझ्यासाठी मार्क ठरल्या.' सुष्मिता सेनने बऱ्याच दिवसांनी ‘आर्या’ या वेब सिरीजमधून पुनरागमन केले आहे. लवकरच या शोचा तिसरा सीझनही प्रदर्शित होणार आहे. (photo: sushmitasen47/ig)