PHOTO : थलैवा रजनीकांत यांचा भन्नाट प्रवास, बस कंडक्टर ते सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार

लवकरच ते सक्रिय राजकारणात प्रवेश करणार आहेत. जानेवारीत ते आपल्या पक्षाची स्थापना करणार असल्याची माहिती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App

2000 सालचा भारत शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या पद्मभूषण ह्या नागरी गौरवाचे मानकरी तसेच अनेक पुरस्कारांचे मानकरी
हालाखीची परिस्थिती असल्यानं बंगळूर बस ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसमध्ये कंडक्टरचं काम त्यांनी केलंय.
लता या त्यांच्या पत्नी तर ऐश्वर्या आणि सौंदर्या या दोन मुली त्यांना आहेत.
जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे.
'शिवाजी द बॉस' चित्रपटाकरिता त्यांना तब्बल 26 कोटी रुपये मानधन देण्यात आले होते.
२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिळ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले.
रजनीकांत यांच्या वडिलांचे नाव रामोजीराव गायकवाड आणि आईचे जिजाबाई गायकवाड असे आहे.
शिवाजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी एका मराठी कुटुंबात झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -