प्रसिद्ध मॉडेलचं ब्रेकअप; 2 वर्षांनंतर नातं संपवलं; ब्रेकअपमागचं कारण काय?
Supermodel Bella Hadid Reportedly Breaks Up: सुपरमॉडेल बेला हदीद आणि अदान बेनुएल्स यांचा ब्रेकअप झाल्याची माहिती.

Supermodel Bella Hadid Reportedly Breaks Up
1/8
Supermodel Bella Hadid Reportedly Breaks Up: हॉलिवूडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकन मॉडेल बेला हदीद हिचा ब्रेकअप झाला असल्याची माहिती समोर आली आहे. काउबॉय अदान बेनुएल्ससोबत तिचे रिलेशनशिप होते. दरम्यान, तिच्या ब्रेकअपच्या बातम्यांना उधाण आलं आहे.
2/8
बेला हदीदने अदान बेनुएल्ससोबत ब्रेकअप केल्याचे वृत्त आहे. एंटरटेनमेंट टुनाईटने 26जानेवारी रोजी त्यांच्या ब्रेकअपची बातमी दिली.
3/8
दोघांच्या ब्रेकअपची बातमी समोर येताच त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला.
4/8
या जोडप्याने फेब्रुवारी 2024मध्ये इन्स्टाग्रामवर त्यांचे नाते अधिकृत केले. हदीदने 2024च्या व्हॅलेंटाईन डे रोजी अदान बेनुएल्ससोबत रिलेशनशिपला सुरूवात केली.
5/8
2023 साली त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. 2024 मध्ये ओरेबेला लाँच इव्हेंटमध्ये ते एकत्र दिसले होते. दोघांच्या नात्याची प्रचंड चर्चा झाली होती.
6/8
दरम्यान, 26 जानेवारीला त्यांचं नातं संपुष्टात आल्याची बातमी समोर आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेकअप झाल्यापासून बेला सकारात्मक आणि कामात व्यस्त राहण्याचा प्रयत्न करीत आहे.
7/8
दोघांचे रिलेशनशिपमध्ये असतानाचे अनेक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते.
8/8
2024च्या व्हॅलेंटाईन डेला हदीद आणि अदान बेनुएल्स एकत्र रिलेशनशिपमध्ये आले होते. तिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून याची माहिती दिली. दरम्यान, रिलेशनशिपच्या दोन वर्षांनंतर त्यांचे नाते संपुष्टात आले.
Published at : 27 Jan 2026 05:58 PM (IST)