Sunny Leone : सनीसोबत झाला फ्रॉड, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती!
Sunny Leone : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) चित्रपटातील अभिनयामुळे आणि तिच्या स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असते. नुकताच सनीसोबत एक फ्रॉड झाला आहे. सनीनं सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली आहे. (PHOTO: sunnyleone/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'moneycontrol.com' च्या रिपोर्टनुसार, सनीनं एक ट्वीट शेअर करून सांगितलं की, तिच्या पॅन कार्डचा वापर करून एका व्यक्तीनं धनी अॅपवरून दोन हजार रुपयांचे कर्ज घेतले.(PHOTO: sunnyleone/IG)
सनीनं या मधून हेही लिहिले की, तिची कोणीही मदत केली नाही आणि पॅनकार्डचा वापर करून कर्ज घेतल्यामुळे तिचा CIBIL स्कोअर देखील कमी झाला. पण त्यानंतर सनीनं हे ट्वीट डिलीट केलं. सनीनं दुसरं ट्वीट शेअर करून त्यामध्ये मदत केल्याबद्दल इंडिया बुल्स सिक्यूरिटीजचे आभार मानले आहेत. (PHOTO: sunnyleone/IG)
सनीनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'IVL सिक्यूरिटीज, ib होम लोन्स आणि CIBIL_Official यांचे मी आभार मानते. त्यांनी माझी मदत केली. ' (PHOTO: sunnyleone/IG)
गेल्या काही दिवसांत इंडियाबुल्स प्लॅटफॉर्म धनी अॅपवर अनेकांनी कर्जाच्या फसवणुकीबाबत तक्रार केली आहे. सनी लिओनीच्या या ट्विटनंतर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की त्यांना कर्जासाठी काही एजंटांकडून कॉल येत आहेत. (PHOTO: sunnyleone/IG)
सनी बरोबरच अभिनेत्री शबाना आझमी आणि अमृता राव या अभिनेत्रींसोबत देखील वेगवेगळ्या माध्यमांमधून फ्रॉड झाला (PHOTO: sunnyleone/IG) आहे.
अनेक वेळा असे घडते की आपण नकळत पॅन कार्ड , आधार कार्ड यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे काही लोकांसोबत शेअर करतो. पण काही अॅप्स असे तुमच्या कागदपत्रांचा आणि माहितीचा चुकीचा वापर करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांपासून सावध राहा. (PHOTO: sunnyleone/IG)