Siddharth Jadhav | मराठी मनोरंजनसृष्टीतला स्टाइल आयकॉन सिद्धार्थ जाधव नवीन लूक व्हायरल!
मराठी मनोरंजनसृष्टीतला स्टाइल आयकॉन अशी ओळख असलेल्या सिद्धार्थ जाधव आता बॉलिवूडमध्येही उत्तम कामगिरी करत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोलमाल, गोलमाल रिटर्न्स, सिम्बा अशा सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये त्याने अभिनय केला आहे पण त्यांचे पहिले प्रेम म्हणजे मराठी चित्रपट, टीव्ही आणि स्टेज असल्याचे तो ठामपणे सांगतो.
मिथुन चक्रवर्ती मुख्य भूमिकेत असणार्या अमी सुभाष बोलची नावाच्या बंगाली चित्रपटातही जाधव याने अभिनय केला आहे.
सिद्धार्थने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात अगदी लहान वयातच केली होती आणि 1996 मध्ये रविकिरण बालनाट्य स्पर्धा येथे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला होता.
सिद्धू सध्या तरुणांचा स्टाईल आयकॉन बनला असून, अनेक जण त्याच्या स्टाईल स्टेटमेंट फॉलो करत आहेत. या सर्वाचं श्रेय तो त्याची स्टायलिस्ट श्वेता शिंदे आणि पत्नी तृप्ती हिला देतो.
लोकांसमोर उत्तम प्रकारे स्वत:ला सादर करण्यामध्ये बायको तृप्ती आणि त्याची स्टायलिस्ट श्वेता, मेकअपमन बिपीन आणि त्याचा सहाय्यक राजू यांचा महत्त्वाचा वाटा असतो, असं तो सांगतो.