Guess Who: एकेकाळी बेरोजगार, पत्नीच्या कमाईने घर चालवायचा, 'स्त्री 2' चा 'हा' अभिनेता आज कोट्यवधींचा मालक!

Guess Who: स्त्री 2 चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. याच स्त्री-2 चित्रपटात काम करणारा एक अभिनेता कधीकाळी बेरोजगार होता. पण आज अभिनयाने त्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.

'स्त्री 2' चित्रपटातील अभिनेता कधीकाळी बेरोजगार होता. तो बेरोजगार असताना त्याचे घर त्याच्या पत्नीच्या कमाईतून चालत होते. पण आज या अभिनेत्याची संपत्ती कोटींच्या घरात आहे. कधीकाळी हा अभिनेता कामासाठी घरोघरी भटकायचा. चला जाणून घेऊया कोण आहे हा अभिनेता

1/7
प्रसिद्घ अभिनेता पंकज त्रिपाठी यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. पंकज यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत.
2/7
अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी अनेकवेळा आपल्या गंभीर अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. सध्या अभिनेता पंकज राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या 'स्त्री 2' या चित्रपटातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
3/7
'स्त्री 2' या चित्रपटात अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी रूद्र नावाचे पात्र केले आहे. Free Press Journal च्या रिपोर्ट नुसार अभिनेता पंकज त्रिपाठी यांना या भूमिकेसाठी 3 कोटी रुपये मिळाले आहेत.
4/7
अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले 'मला आठवतंय माझ्याकडे काम नव्हतं आणि माझी बायको मुंबईतल्या शाळेत शिकवायची. तिने एकट्याने घर चालवले आणि त्याद्वारे घरच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या.
5/7
अभिनेता पुढे म्हणाले, 'मला वाटत नाही की माझी खूप दुःखद संघर्ष कथा आहे. मला कधीही रस्त्यावरच्या दिव्याखाली बसावे लागले नाही किंवा रेल्वे स्टेशनवर झोपावे लागले नाही. आम्ही एका लहान स्वयंपाकघरात एका खोलीत राहत होतो आणि ते दिवस आनंदी होते,"
6/7
अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी 2004 साली 'रन' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूड क्षेत्रात पदार्पण केलं. परंतु, त्यांना 2012 साली आलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर' चित्रपटातून खरी ओळख मिळाली. यानंतर ते 'मिर्झापूर' वेब सीरिजमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले.
7/7
अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी अनेक चित्रपट तसेच सीरिजमध्ये काम केलेले आहे. भरपूर प्रसिद्धीसोबतच त्यांनी भरपूर संपत्तीही कमावली आहे. GQ इंडियाच्या रिपोर्टनुसार, त्यांची एकूण संपत्ती 40 कोटी रुपये आहे.
Sponsored Links by Taboola