Box office collection: 'स्पायडरमॅन'ची बॉक्स ऑफिसवर वादळी एन्ट्री; अवघ्या 3 दिवसांत कमाईचे सर्व अंदाज मोडले; आतापर्यंत किती कमावले?
2026 मध्ये तिसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत धुरंधर 2 पहिल्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 113 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.
Continues below advertisement

Spiderman box office collection
Continues below advertisement
1/7
हॉलिवूडचा बहुप्रतिक्षित 'स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे' (Spider-Man: Brand New Day) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
2/7
चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असून, अवघ्या तीन दिवसांतच त्याने तुफान कमाई केली आहे. थिएटरमध्ये स्पायडर-मॅन पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे.
3/7
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 70.25 कोटी रुपयांची कमाई केली. देशभरात चित्रपटाचे 17,703 शो लागले होते. तर एकूण 77 टक्के ऑक्युपन्सी नोंदवण्यात आली.
4/7
या चित्रपटाच्या इंग्रजी आवृत्तीने 40.60 कोटी रुपये, हिंदीने 23 कोटी रुपये, तमिळ 3.75 कोटी रुपये, तेलुगू आवृत्तीने 2.75 कोटी रुपये कमावले. तर कन्नडमध्ये 7 लाख रुपये आणि मल्याळममध्ये 8 लाख रुपये इतकी कमाई झाली.
5/7
अवघ्या तीन दिवसांत चित्रपटाने भारतात 180.20 कोटी रुपयांची नेट, तर 215.47 कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली आहे.
Continues below advertisement
6/7
स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे' हा चित्रपट 30 जुलै 2026 रोजी भारतात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन डेस्टिन डॅनिएल क्रेटन यांनी केले आहे.
7/7
भारतात स्पायडर-मॅनचा मोठा चाहतावर्ग असल्याने चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
Published at : 02 Aug 2026 12:57 PM (IST)