South Indian Richest Actor: साऊथचा सर्वात श्रीमंत अभिनेता, ज्याच्याकडे सलमान-आमिरपेक्षाही जास्त पैसा; 'या' बॉलिवूड अदाकारेसोबत जोडलं गेलेलं नाव
South Indian Richest Actor: एककाळ असा होता की, देशातील फिल्म इंडस्ट्री म्हणजे, बॉलिवूड. फक्त जगातच नाहीतर देशातही बॉलिवूडचा दबदबा होता. पण, आता काळ काहीसा बदलल्याचं पाहायला मिळत आहे.
South Indian Richest Actor Nagarjuna
1/11
आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस आलेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. फाल लांब नाही, पण फक्त गेल्या सहा महिन्यात आलेल्या चित्रपटांबाबत बोललो तरीसुद्धा बॉलिवूडपेक्षा साऊथ इंडस्ट्रीचंच पारडं जड झाल्याचं पाहायला मिळतं. गेल्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर एकापेक्षा एक बिग बजेट बॉलिवूडपट गळपटल्याचं पाहायला मिळालं, पण त्याचबरोबर साऊथच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवल्याचं पाहायला मिळालं.
2/11
दाक्षिणात्य चित्रपट बॉलिवूडपेक्षा महागडे आणि जास्त कमाई करणारे ठरत आहेत. इतकंच नाही तर हॉलिवूडमध्येही अनेकदा दक्षिण भारतीय चित्रपटांची चर्चा होते. जसे, साऊथचे चित्रपट सुपरहिट ठरतात, त्याचप्रमाणे साऊथचे स्टार्सही प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसत आहेत. आज आपण अशाच एका स्टारबद्दल बोलणार आहोत, जो श्रीमंतीच्या बाबतीत बॉलिवूडच्या तीनही खान्सना मागे टाकतो. हेच काय बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चनही श्रीमंतीच्या बाबतीत याच्या आसपास नाहीत.
3/11
गेल्या काही दशकांमध्ये, दक्षिण भारतीय चित्रपटांसोबतच, त्यांच्या स्टार्सची प्रतिष्ठाही खूप वाढली आहे. त्यांच्यामध्ये असे अनेक स्टार्स आहेत, जे बॉलिवूडच्या मोठ्या स्टार्सशी स्पर्धा करू शकतात. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत स्टार्सबद्दल बोलायचं झालं तर, तो दक्षिणेतील मोठे स्टार्स, तसेच हिंदी चित्रपटांमधील टॉप स्टार्सपेक्षा कितीतरी पटींनी श्रीमंत आहे.
4/11
सिनेसृष्टीच्या गॉसिप सर्कलमध्ये, या दक्षिणात्य सिनेसृष्टीतील स्टार आणि बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री तब्बूसोबतच्या नात्याबद्दलही चर्चा सुरू होती. असंही म्हटलं जातं की, त्यांचं प्रेम सुमारे 15 वर्ष फुललं पण नंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. असं म्हटलं जात होतं की, अभिनेता आधीच विवाहित असल्यानं, तब्बूला नात्यात हवी असलेली स्थिरता तो देऊ शकला नाही. त्यामुळेच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
5/11
आपण ज्या अभिनेत्याबाबत बोलतोय, तो दुसरा-तिसरा कोणी नसून साऊथ सुपरस्टार 'नागार्जुन' आहे. नागार्जुनची संपत्ती एवढी आहे की, त्याच्या संपत्तीसमोर बॉलिवूडचे तिनही खान्स पानी कम चाय आहेत.
6/11
मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, नागार्जुनची एकूण संपत्ती सुमारे 410 दशलक्ष डॉलर्स (3572 कोटींपेक्षा जास्त) आहे. दरम्यान, तो अजूनही श्रीमंत भारतीय स्टार्सच्या यादीत शाहरुख खान आणि जुही चावलाच्या मागे आहे.
7/11
हो, तेलुगू सुपरस्टार नागार्जुनकडे 'खुदा गवाह' चित्रपटातील त्याचे सहकलाकार अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त संपत्ती आहे. नागार्जुनची अफाट संपत्ती त्याला अमिताभ बच्चन (3200 कोटी), हृतिक रोशन (3100 कोटी), सलमान खान (2900 कोटी), अक्षय कुमार (2700 कोटी) आणि आमिर खान (1900 कोटी) यांसारख्या बॉलिवूडमधील आघाडीच्या स्टार्सपेक्षाही श्रीमंत बनवते, असं म्हटलं जातं.
8/11
साऊथमधील टॉप कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर, नागार्जुननंतर चिरंजीवी आहे, ज्यांची एकूण संपत्ती 1650 कोटी असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर दक्षिणेतील श्रीमंत स्टार राम चरण (1370 कोटी), कमल हासन (600 कोटी), रजनीकांत (500 कोटी), ज्युनियर एनटीआर (500 कोटी) आणि प्रभास (250 कोटी) यांचा क्रमांक लागतो.
9/11
असंही म्हटलं जातं की, नागार्जुन हा तेलुगू चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे, पण तो कधीही टॉप स्टार नव्हता. हा टॅग चिरंजीवीनं सर्वाधिक वेळ स्वतःकडे ठेवला होता, त्यानंतर तो प्रभास आणि राम चरण यांनी मिळवला. तरीही, नागार्जुन त्या सर्वांपेक्षा श्रीमंत आहे. हे स्मार्ट व्यवसाय गुंतवणूक आणि वडिलोपार्जित प्रॉपर्टीमुळे देखील आहे.
10/11
नागार्जुननं केवळ चित्रपटांमधूनच नव्हे तर रिअल इस्टेट, सिनेमा आणि स्पोर्ट्स फ्रँचायझीसह इतर अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक करून ही प्रचंड संपत्ती कमावली आहे. नागार्जुन 'अन्नपूर्णा स्टुडिओ'चे मालक आहेत, जे टॉलीवूडमधील सर्वात मोठ्या प्रॉडक्शन हाऊस आणि स्टुडिओपैकी एक आहे. त्यांच्याकडे एन३ रिअॅल्टी एंटरप्रायझेस ही रिअल इस्टेट आणि बांधकाम कंपनी देखील आहे.
11/11
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नागार्जुनच्या मालकीच्या सर्व रिअल इस्टेट मालमत्तांची किंमत सुमारे 900 कोटी आहे. याशिवाय, नागार्जुनकडे तीन स्पोर्ट्स फ्रँचायझी आहेत. तसेच, एक खाजगी जेट आणि अर्धा डझनहून अधिक लक्झरी कारसह अनेक महागड्या वस्तू आहेत.
Published at : 06 Feb 2025 11:57 AM (IST)