South Cinema Soothravakyam: काठोकाठ भरलेला सस्पेन्स, अंगावर शहारे आणणारा ट्वीस्ट; 8.7 रेटिंगची साऊथ थ्रिलर फिल्म तुम्ही पाहिलीय?

South Cinema Soothravakyam: जुलै महिन्यात एक साऊथ फिल्म थिएटरमध्ये रिलीज झाली होती. या सिनेमाच्या कथेत एवढा सस्पेन्स आणि थ्रील आहे की, मनोरंजनाचं संपूर्ण पॅकेज तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे.

South Cinema Soothravakyam

1/8
साऊथच्या या थ्रिलर सिनेमानं लोकांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण करायला सुरुवात केली आहे. या सिनेमाचं कथानक इतकं भारी आहे की, तुम्ही त्यात गुंतून राहता.
2/8
आज आम्ही ज्या सिनेमाबाबत सांगत आहोत, त्याचं नाव 'सूथ्रवाक्यम' आहे. या सिनेमात कोणतीही मोठी क्राइम मिस्ट्री नाही किंवा कोर्टरूम ड्रामाही नाही. पण, तरीही चित्रपटातं कथानक शेवटपर्यंत खिळवून ठेवतं.
3/8
या सिनेमात शहरातील एका लहान पोलीस चौकीची आणि त्याच्या जवळील एका सरकारी शाळेची कथा दाखवण्यात आली आहे. पण, एक छोटीशी घटना घडते आणि चित्रपटाच्या कथेचा सस्पेन्स वाढतो.
4/8
एक घटना घडते आणि शांत, आनंदी शहरात गोंधळ, भितीचं वातावरण पसरतं. तिथे राहणाऱ्या लोकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होतं. चित्रपटाची कथा हळूहळू तुम्हाला एवढी खिळवून ठेवते की, तुम्ही तुमच्या पापण्या मिटतानाही विचारात पडाल.
5/8
कोणताही मोठा कोर्टरूम ड्रामा आणि खून खटला नसताना, या चित्रपटाची कथा साध्या निर्णयांचा नकारात्मक परिणाम दाखवते. या शहराचे पोलीस स्टेशन मुलांसाठी शिकवणी केंद्रात रूपांतरित झाल्यानंतरच सस्पेन्स निर्माण होतो.
6/8
कथेतील तणाव, छोट्या निर्णयांमधून निर्माण होणारा मोठा परिणाम आणि मुख्य पात्रांमधील अंतर्गत संघर्ष या चित्रपटाची कथा आणखी शक्तिशाली बनवतो.
7/8
या चित्रपटात, शाइन टॉम टाकोचा सखोल अभिनय आणि विंची अलोशियसची पावरफुल स्क्रीन प्रेजेंस खिळवून ठेवतो.
8/8
रेगिन एस बाबू यांनी लिहिलेल्या या पटकथेत, तुम्हाला इमोशन आणि थराराचं परिपूर्ण संतुलन पाहायला मिळेल. एकूणच, या चित्रपटाद्वारे तुम्हाला मनोरंजनाचं संपूर्ण पॅकेज अनुभवायला मिळणार आहे.
Sponsored Links by Taboola