Sonu Sood : एका चित्रपटामध्ये काम करण्यासाठी सोनू घेतो 'एवढे' मानधन!
Sonu Sood : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. (photo:sonu_sood/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलॉकडाऊनमध्ये सोनूने अनेकांना मदत केली. सोनूनं अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. सोनूच्या चित्रपटांना त्याच्या चाहत्यांची पसंती मिळते. जाणून घेऊयात सोनूकडे असणाऱ्या संपत्तीबाबत... (photo:sonu_sood/ig)
मुंबईमध्ये अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी जेव्हा सोनू आला होता तेव्हा त्याच्याकडे 5500 रूपये होते. पण आता सोनूकडे 130 कोटी रूपये संपत्ती आहे. (photo:sonu_sood/ig)
2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या शहीद या चित्रपटामधून सोनूनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपटांबरोबरच तो जाहिरातींमध्ये देखील काम करतो. सोनूनं आत्तापर्यंत 70 चित्रपटांमध्ये काम केले आहे. (photo:sonu_sood/ig)
हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजबी या भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील सोनूनं काम केले आहे. (photo:sonu_sood/ig)
रिपोर्टनुसार, सोनू एका चित्रपटामध्ये काम करण्यासाठी दोन कोटी रूपये मानधन घेतो. तसेच सोनूचे एक प्रोडक्शन हाऊस देखील आहे. या प्रोडक्शन हाऊसचं नाव हे शक्ती सागर असं आहे. तसेच मुंबईमध्ये सोनूचे तीन फ्लॅट आहे. लोखंडवालामध्ये सोनूचं 4BHK अपार्टमेंट आहे. मुंबईमधील जुहू येथे सोनूचे एक हॉटेल आहे. (photo:sonu_sood/ig)
सोनूकडे अनेक गाड्यांचे कलेक्शन आहे. 2 कोटीच्या लग्झरी कारपासून ते 25 हजाराच्या स्कूटरपर्यंत अनेक गाड्या सोनूकडे आहे. (photo:sonu_sood/ig)