Sonam Kapoor Pics: सेकंड प्रेग्नेंसीच्या अनाउन्समेंटनंतर सोनम कपूर तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करत म्हणते, "मम्मा स्वॅग" पहा फोटो...
Sonam Kapoor Pics: दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असलेली सोनम कपूरने इन्स्टाग्रामवर स्वतःचे फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिचा स्टायलिश लूक दिसत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री पूर्ण स्वॅगमध्ये दिसत आहे.
Continues below advertisement
Sonam Kapoor Pics
Continues below advertisement
1/7
सोनम कपूर ही बॉलिवूडची फॅशन आयकॉन आहे आणि यात काही शंका नाही. जेव्हा जेव्हा ती सोशल मीडियावर फोटो पोस्ट करते, तेव्हा तिच्या स्टाईलवर सगळेच फिदा होतात. शनिवारी सकाळी दुसऱ्यांदा गर्भवती असलेल्या सोनमने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक फोटो पोस्ट केले आणि चाहते तिच्या लूकने थक्क झाले आहेत.
2/7
सोनम कपूरने नुकतीच तिच्या प्रेग्नेंसीची अनाउन्समेंट केली आणि आता तिने तिचे नवीन फोटो शेअर करून इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
3/7
फोटोंमध्ये सोनम ब्लॅक अँड व्हाईट टॉपमध्ये स्टायलिश दिसत आहे, जो तिने मॅचिंग स्कर्ट आणि ओव्हरसाईज ग्रे ब्लेझरसह कॅरी केला आहे.
4/7
केसांना आकर्षक बन बांधून, सोनमने काळे सनग्लासेस आणि पांढऱ्या सॅंडलसह तिचा लूक पूर्ण केला आहे.
5/7
या अभिनेत्रीने अनेक पोझमध्ये सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
Continues below advertisement
6/7
सोनम कपूर तिच्या स्टायलिश लूकचे फोटो पोस्ट करताना सोनमने कॅप्शनमध्ये लिहिले, "मम्मा स्वॅग अॅक्टिव्हेटेड, स्टाईल: नॉन-नेगोशिएबल, एनर्जी: डोन्ट ट्राय मी." तिच्या या फोटोंवर चाहते भरभरून प्रेम देत आहेत.
7/7
या आठवड्याच्या सुरुवातीला सोनम कपूरने इन्स्टाग्रामवर अनेक सुंदर फोटोंसह तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा केली. बॉलिवूड स्टारने तिचा बेबी बंप दाखवत कॅप्शन दिले होते, "आई." सोनम कपूरने 2018 मध्ये आनंद आहुजासोबत लग्न केले. या जोडप्याने 2022 मध्ये मुलगा वायुचे स्वागत केले.
Published at : 22 Nov 2025 04:25 PM (IST)