Sonalee Kulkarni : जागतिक महिला दिनानिमित्त सोनाली कुलकर्णीची खास पोस्ट
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज जागतिक महिला दिनानिमित्त सोनालीने एक लक्षवेधी पोस्ट केली आहे.
स्वत:साठी नाही तर आपल्या माणसांसाठी लढणाऱ्या स्त्रियांना समर्पित पोस्ट सोनालीने केली आहे.
सोनालीचा 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सोनालीने लिहिलं आहे,अफाट ताकदीने आणि इच्छाशक्तीच्या जोरावर राज्य वाचवणाऱ्या इतिहासातील मोजक्या महिलांपैकी ताराबाईंच्या अदम्य धाडसाला आणि अदम्य वृत्तीला सलाम करावा लागेल.
सोनालीने पुढे लिहिलं आहे, मी हा जागतिक महिला दिन त्यांना आणि त्यांच्यासारख्या स्त्रियांना समर्पित करते. ज्या केवळ स्वत:साठीच नाही तर आपल्या माणसांसाठी लढतात.
सोनालीच्या पोस्टवर शक्तीला मानाचा मुजरा, जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा, खूपच सुंदर, जय भवानी, जय शिवराय, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
सोनालीचा 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा सिनेमा डॉ. जयसिंहराव पवार यांच्या कादंबरीवर आधारित आहे.
'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या सिनेमात सोनाली ताराराणींच्या भूमिकेत झळकणार आहे.
'जागतिक महिला दिना'निमित्त सोनाली कुलकर्णी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.