काळ्या लेहेंग्यात सोनाक्षी सिन्हाने वेधलं लक्ष, अभिनेत्रीच्या सुंदर लूकने चाहते झाले घायाळ!

बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या हीरामंडी या मालिकेमुळे चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मालिकेतील तिच्या व्यक्तिरेखेला खूप पसंत केले जात आहे.

सोनाक्षी केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या स्पष्टवक्ते शैलीसाठीही प्रसिद्ध आहे.
आज सोनाक्षीची इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख आहे. ती नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते.
नुकतेच सोनाक्षी सिन्हाने तिचे लेटेस्ट फोटोशूट तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे, जे पाहून चाहते तिच्या सौंदर्याचे चाहते झाले आहेत.
अभिनेत्री काळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे. अभिनेत्रीच्या लेहेंग्यावर पांढऱ्या रंगाच्या धाग्याने भरतकाम करण्यात आले आहे.
या ड्रेसमध्ये सोना खूपच सुंदर दिसत आहे.
सोनाक्षीने तिच्या लेहेंग्याच्या ओढणीनेने डोके झाकले आहे. अभिनेत्रीने पार्टीशन बन, सिल्वर झुमकासह तिचा लूक पूर्ण केला आहे.
सोना खूपच क्लासी आणि सुंदर दिसत आहे. लॅक्मे फॅशन वीकमध्ये या अभिनेत्रीने विक्रम फडणीसचा हा ड्रेस परिधान केला होता, ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सोनाक्षी सिन्हा नुकतीच नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडी द डायमंड बाजार या वेब सीरिजमध्ये दिसली होती.
या चित्रपटात तिने फरीदानची भूमिका साकारली आहे..(photo:aslisona/ig)