PHOTO: 'दबंग' चित्रपटासाठी सोनाक्षीने कमी केलं तब्बल 30 किलो वजन; जाणून घ्या अभिनेत्रीबद्दल खास गोष्टी...
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आज (2 जून) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीचा जन्म 2 जून 1987 रोजी बिहारमध्ये झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची ती मुलगी आहे. (photo:aslisona/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोनाक्षी सिन्हाने आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांसोबत मोठ्या पडद्यावर काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिने आपल्या करिअरची सुरुवात अभिनेता सलमान खानच्या ‘दबंग’ या चित्रपटातून केली होती. (photo:aslisona/ig)
सलमान-सोनाक्षीचा 'दबंग' हा चित्रपट 2010मध्ये रिलीज झाला होता. सोनाक्षी सिन्हाने तिच्या पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली होती. पण, या चित्रपटापूर्वीच तिन्ही आपली ओळख ‘फॅशन डिझायनर’ म्हणून केली होती. (photo:aslisona/ig)
तिने बराच काळ डिझायनर म्हणून काम केले होते. परंतु, जेव्हा सलमान खानने तिला पहिल्यांदा पाहिले, तेव्हा सोनाक्षी सिन्हाचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. सलमानने पाहताच क्षणी तिला चित्रपटाची ऑफर दिली होती. (photo:aslisona/ig)
सोनाक्षी सिन्हाला 'दबंग'मध्ये एका खेड्यातील मुलीच्या भूमिकेत येण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली होती, ज्यामध्ये सलमान खानने तिला खूप साथ दिली. सलमानने तिला 'दबंग' कसा ऑफर केला, हे सोनाक्षीने तिच्या अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. ‘दबंग’ चित्रपट ऑफर झाला, तेव्हा सोनाक्षी सिन्हाचे वजन वाढलेले होते. ते कमी केल्यास चित्रपटात काम देईन असे सलमान खानने तिला सांगितले होते. (photo:aslisona/ig)
त्यानंतर सलमान खानच्या सल्ल्यानुसार सोनाक्षी सिन्हाने तिच्या शरीरावर काम सुरू केले आणि ते पाहून सलमानने त्याच्या आगामी चित्रपटासाठी तिची निवड केली. तिने 'दबंग' चित्रपटासाठी तब्बल 30 किलो वजन कमी केले. या चित्रपटातील तिच्या अभिनयाची बॉलिवूडमध्ये खूप चर्चा झाली. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कारही मिळाला होता. या चित्रपटानंतर सोनाक्षीचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आणि तिने एकामागून एक अनेक चित्रपटांमध्ये काम केले. (photo:aslisona/ig)