ऐश्वर्या रायची कार्बन कॉपी स्नेहा उल्लालबाबत या गोष्टी माहिती आहे का?
सलमान खानने स्नेहा उल्लालला बॉलीवूडमध्ये आणले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिचा पहिला चित्रपट 2005 मध्ये आय लकी नो टाइम फॉर लव्ह आला.
या अभिनेत्रीने फिल्मी दुनियेत फार काही केले नसले तरी ऐश्वर्याची कार्बन कॉपी म्हणून तिची जास्त चर्चा झाली.
18 डिसेंबर 1987 रोजी जन्मलेली अतिशय सुंदर स्नेहा आज तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे.
स्नेहा उल्लालची तुलना ऐश्वर्या राय बच्चनशी केली जात होती.
अभिनेत्रीचा लूक अगदी ऐश्वर्यासारखा आहे, तिचे डोळे देखील ऐश्वर्यासारखे निळे आहेत. स्नेहा बराच काळ फिल्मी दुनियेपासून दूर राहिली.
विशेष बाब म्हणजे या अभिनेत्रीने जेव्हा अभिनय क्षेत्रात आपल्या करिअरची सुरुवात केली तेव्हा ती केवळ 18 वर्षांची होती.
लकी या चित्रपटातून पदार्पण करणार्या स्नेहाने आर्यन, जाने भी दो यारों आणि क्लिक या चित्रपटांमध्येही काम केले.
अभिनेत्री शेवटची बेजुबान चित्रपटात दिसली होती. एक्सपायरी डेट या वेब सीरिजमध्ये देखील तिने काम केले आहे.
स्नेहाला ऐश्वर्याची कार्बन कॉपी म्हटले जात असले तरी, या अभिनेत्रीने अनेकवेळा मान्य केले आहे की, यामुळे तिला अनेक अडचणींमधून जावे लागले.