In Pics : राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्रला मातृत्त्वाची चाहूल
आयुष्याची किंमत तेव्हाच कळते जेव्हा तुमच्यात एक आयुष्य उदयास येत असतं.... या ओळी अतिशय समर्पक आणि तितक्याच वास्तवदर्शी आहेत. (छाया सौजन्य- सावनी रवींद्र/ इन्स्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयुष्य, जीवन ही जणू एक अनमोल भेटच आहे आणि आपल्याला याचं महत्त्वं कळल्याची सुरेख अनुभूती राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रविंद्र हिला झाली आहे. . (छाया सौजन्य- सावनी रवींद्र/ इन्स्टाग्राम)
सावनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकतंच तिच्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली. अतिशय सुरेख शब्दांच सुरुवातीलाच उल्लेख केलेल्या ओळी लिहीत तिनं आपल्याला मातृत्त्वाची चाहूल लागल्याची आनंदवार्ता सर्वांना सांगितली. . (छाया सौजन्य- सावनी रवींद्र/ इन्स्टाग्राम)
'माझं बाळ माझ्यासाठी लकी चार्म आहे. कारण माझं बाळ पोटात असताना मला माझ्या आयुष्यातील इतका मोठा प्रतिष्ठीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला', असं ती मोठ्या आनंदात म्हणते. . (छाया सौजन्य- सावनी रवींद्र/ इन्स्टाग्राम)
मागील सहा महिन्यांत गरोदरपणात अनेक वेगवेगळे म्युझीक अल्बम, नविन गाणी, काही प्रोजेक्टस शूट केलेत. त्यातील बरीचशी गाणी रिलीज झाली. काही गाणी लवकरच रिलीज होतील, असं म्हणत दरम्यानच्या काळातील दिवसांची माहितीही तिनं दिली. . (छाया सौजन्य- सावनी रवींद्र/ इन्स्टाग्राम)
मला खूप अभिमान आहे की माझ्या होणा-या बाळाने मला कामाच्या दरम्यानही अजिबात त्रास दिलेला नाही, असं म्हणत सावनीनं आपण बाळाच्या स्वागतासाठी फारचं उत्सुक असल्याचं म्हटलंय. . (छाया सौजन्य- सावनी रवींद्र/ इन्स्टाग्राम)