Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding: 'आता आमची पर्मनंट बुकिंग झाली', सिद्धार्थ-कियाराने शेअर केलं लग्नाचे फोटो

Sidharth Malhotra and Kiara Advani share first official wedding pics See here

1/7
बॉलिवूडचे लव्हबर्ड्स कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​लग्नबेडीत अडकले आहेत.
2/7
दोघांनी जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये थाटामाटात लग्न केले आहे. आता त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये दोघेही खूप क्यूट दिसत आहेत.
3/7
या दोघांनीही सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'आता आमची पर्मनंट बुकिंग झाली आहे.'
4/7
सिद्धार्थ आणि कियारा यांनी राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेसच्या मंडपात सात फेरे घेतले. सिद्धार्थ आणि कियारा यांचा विवाह सोहळा कुटुंबातील सदस्य आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थित पार पडला.
5/7
त्यांच्या लग्नसोहळ्याची थिम 'पिंक अँड व्हाईट' अशी होती.
6/7
वर पक्षातील पाहुण्यांनी व्हाईट तर वधू पक्षातील पाहुण्यांनी पिंक कलरचे कपडे परिधान केले होते.
7/7
सिद्धार्थ आणि कियारा यांच्या विवाह सोहळ्याला करण जोहर, शाहिद कपूर, मीरा कपूर, जूही चावला, मनीष मल्होत्रा यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. सिद्धार्थ आणि कियारा यांनी मनीष मल्होत्रानं डिझाइन केलेले आऊटफिट परिधान केले होते. या लग्नाला 100 ते 150 लोक उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे.
Sponsored Links by Taboola