PHOTO : सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योद्धा' चा फर्स्ट लूक, प्रोमो चर्चेत
Sidharth Malhotra First Look As Yodha : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) त्याच्या अभिनयाने नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिद्धार्थच्या 'शेरशाह' (Shershaah) या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
नुकतेच चित्रपट निर्माता करण जोहरने (Karan Johar) सिद्धार्थच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचा मोशन पोस्टर करणने शेअर केला आहे.
करण जोहरने शेअर केलेल्या योद्धा या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये सिद्धार्थ हटके लूकमध्ये दिसत आहेत. हा पोस्टर शेअर करून करणने कॅप्शनमध्ये लिहीले, 'धर्मा प्रॉडक्शनच्या पहिल्या अॅक्शन फ्रँचायझीमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा एका दमदार शैलीत दिसणार आहे.
योद्धा या चित्रपटाचे दिग्दर्शन सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा हे करणार आहेत. हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
करणने शेअर केलेल्या या मोशन पोस्टरमधील सिद्धार्थच्या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत असून या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत.