PHOTO: अभिनेता श्रेयस तळपदेचा 'हा' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी त्याने गाजवली आहे.(pc:shreyastalpade27/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अनेक सुपरहिट सिनेमांचा तो भाग आहे. पण काही दिवसांपूर्वी एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. pc:shreyastalpade27/ig)

आता आजारपणानंतर श्रेयस एका नव्या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज आहे. (pc:shreyastalpade27/ig)
महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) मुव्हिज आणि झी स्टुडिओज निर्मित, महेश मांजरेकर दिग्दर्शित 'ही अनोखी गाठ' (Hi Anokhi Gath) या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. यात श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि गौरी इंगवले (Gauri Ingawale) यांच्या प्रमुख भूमिकेत आहेत. (pc:shreyastalpade27/ig)
ही अनोखी गाठ' चित्रपटाची कथा, पटकथा महेश मांजरेकर यांचीच आहे तर चित्रपटाचे संवाद गणेश मतकरी यांचे आहेत. ‘ही अनोखी गाठ’च्या निमित्ताने महेश मांजरेकर आणि श्रेयस तळपदे ही जोडी पहिल्यांदा एकत्र येत आहेत. हा चित्रपट 1 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. (pc:shreyastalpade27/ig)
अभिनेता श्रेयस तळपदेने मराठीसह हिंदी सिनेमांतदेखील आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. (pc:shreyastalpade27/ig)
श्रेयस तळपदेला सध्या 'वेलकम टू द जंगल' (Welcome to the Joungle) या सिनेमाचं शूटिंग करत आहे.(pc:shreyastalpade27/ig)
श्रेयसने मराठी मालिकांच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. 1998 मध्ये त्याने 'वो' ही मालिका केली. (pc:shreyastalpade27/ig)
या कार्यक्रमात तो मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं. करिअरच्या सुरुवातीला यश मिळत नसल्याने श्रेयसने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला(pc:shreyastalpade27/ig)
दरम्यान नागेश कुकनूर एक सिनेमा बनवत असल्याचं श्रेयसला कळलं आणि लगेचच त्याने या सिनेमासाठी ऑडिशन दिली. यात सिनेमासाठी त्याची निवड झाली आणि खऱ्या अर्थाने त्याला ब्रेक मिळाला.(pc:shreyastalpade27/ig)