Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरचा देसी अंदाज; नव्या फोटोंमध्ये दिसतेय खास!

श्रद्धा कपूर तिच्या स्त्री 2 चित्रपटाच्या भव्य यश साजरं करत आहे, ज्याने सर्व रेकॉर्ड मोडले आणि बॉक्स ऑफिसवर 800 कोटींहून अधिक कमाई केली.

Shraddha Kapoor

1/10
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते शक्ती कपूर यांची मुलगी अभिनेत्री श्रद्धा कपूर हिला चित्रपटसृष्टीत येऊन १४ वर्षे झाली असून या सर्व वर्षांत श्रद्धाने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
2/10
मात्र, तिची खरी ओळख 2013 मध्ये आलेल्या 'आशिकी 2' चित्रपटातून झाली.
3/10
श्रद्धा कपूरने 2010 मध्ये आलेल्या 'तीन पत्ती' या सिनेमातून तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.
4/10
या चित्रपटात अमिताभ बच्चन, बेन किंग्सले, आर. माधवन, रायमा सेनसारखे कलाकार दिसले. मात्र, हा चित्रपट फारसा चालला नाही.
5/10
श्रद्धा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती 'आशिकी 2', 'एक व्हिलन', 'बागी', 'हाफ गर्लफ्रेंड', 'छिछोरे', 'स्त्री' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि पात्रांसाठी ओळखली जाते.
6/10
तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोललो तर, या दिवसांमध्ये अभिनेत्री राहुल मोदीला डेट करत असल्याची चर्चा होती.
7/10
मात्र, काही काळापूर्वी त्यांच्या ब्रेकअपची बातमी व्हायरल झाली होती.
8/10
श्रद्धाने नुकताच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात ती लेहंग्यात दिसत आहे.
9/10
या लूकमध्ये तिचे मोकळे केलं लक्ष वेधून घेत आहे.
10/10
न्यूड शेडच्या ड्रेसमध्ये श्रद्धा फारच सुंदर दिसत आहे.
Sponsored Links by Taboola