In Pics: रणबीर आणि श्रद्धा पहिल्यांदाच करणार स्क्रिन शेअर!

bollywood
1/6
Ranbir Kapoor-Shraddha Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor ) यांचा चाहता वर्ग मोठा आहे.
2/6
ही जोडी लवकरच एका चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
3/6
दिग्दर्शक लव रंजन (luv ranjan) यांच्या लव फिल्म्स या प्रोडक्शन हाऊसने सोशल मीडियावर पोस्ट करत या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे.
4/6
लव फिल्म्सने सोशल मीडियावर पोस्ट केली, 'लव रंजन यांनी दिग्दर्शन केलेला बहुचर्चित चित्रपट 26 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
5/6
अभिनेत्री डिंपल कपाडिया या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत.
6/6
या चित्रपटाच्या नावाबाबत अजून कोणतीही घोषणा लव फिल्म्सने केली नाही. पण चित्रपटात रणबीर आणि श्रद्धा पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत असल्याने प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहेत.
Published at : 19 Nov 2021 05:56 PM (IST)