पत्रकार होण्याचं स्वप्न, पण झाली अभिनेत्री; अभिनयातून जिंकलं प्रेक्षकांचं मन, 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?
Shraddha Das A Journey from Mass Media Student to Actress: पत्रकार बनण्याचे स्वप्न पाहणारी श्रद्धा अभिनेत्री बनली. तिचा प्रवास सोपा नव्हता.

Shraddha Das A Journey from Mass Media Student to Actress
1/8
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा दासची कहाणी फिल्मी स्क्रिप्टपेक्षा कमी नाही. जर्नलिज्म ते सिल्व्हर स्क्रीनपर्यंतचा तिचा प्रवास खूप रंजक होता. 4 मार्च म्हणजे आज तिचा वाढदिवस. तिच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीच्या करिअरविषयी जाणून घेऊयात.
2/8
श्रद्धा दासचा जन्म मुंबईतील एका बंगाली कुटुंबात झाला. तिनं मुंबई विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास मीडियाचं शिक्षण घेतलं.
3/8
अभिनेत्रीला पत्रकार म्हणून करिअर घडवायचे होते. परंतु, ती नशीबाने अभिनेत्री झाली. तिनं अॅक्टिंगला गांभीर्यानं घेतलं.
4/8
अभिनेत्रीनं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे घेतले. तिनं पीयूष मिश्रा आणि चितरंजन गिरीकडून थिएटर वर्कशॉपमध्ये अभिनय नेमका काय असतो? हे शिकून घेतलं.
5/8
2008 साली अभिनेत्रीनं तेलुगु चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तिला पहिल्या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. तिचा चुलबुली अंदाज प्रेक्षकांना आवडला.
6/8
तिला सिक्वल क्वीन म्हणूनही इंडस्ट्रीत ओळखलं जातं. तिनं आतापर्यंत बऱ्याच हिट चित्रपटांच्या सिक्वेलमध्ये काम केलं आहे. तिनं साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना आवडलीये.
7/8
2010 साली लाहौर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करण्यासाठी तिनं प्रचंड मेहनत घेतली.
8/8
फक्त हिंदी किंवा तेलुगु नाही तर, तिनं तामिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली चित्रपटांमध्येही प्रमुख भूमिका साकारली आहे. दिल तो बच्चा है जी, ग्रेट ग्रँड मस्ती, सनम तेरी कसम, या चित्रपटांमुळे तिला ओळख मिळाली.
Published at : 04 Mar 2026 07:05 PM (IST)