Auto Shankar: वेश्याव्यसाय अन् हिंसेचा खेळ; ऑटो ड्रायव्हर कसा अडकला गुन्ह्यांच्या जाळ्यात? सत्य घटनेवर आधारीत 'ही' क्राइम थ्रिलर सिरीज पाहिलीत का?
Serial Killer Story on OTT: ऑटो ड्रायव्हर कसा अडकला गुन्ह्यांच्या जाळ्यात? ऑटो शंकर या वेब सिरीजची चर्चा.

Auto Shankar True Story Web Series
1/8
Auto Shankar True Story Web Series: ओटीटी प्लॅटफॉर्मवरील असे अनेक वेब सिरीज आणि चित्रपट आपण पाहिले असतील, ज्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: हादरवून सोडलं असेल. सध्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांचा ट्रेंड सुरू आहे. अशाच एका सिरीजची चर्चा होत आहे. ही थ्रिलर वेब सिरीज सिरियल किलरवर आधारीत असून, ही कथा अत्यंत भयानक आहे.
2/8
जर, आपल्याला क्राइम थ्रिलर सिनेमा आवडत असेल तर, ZEE 5 वरील 'ऑटो शंकर' ही मालिका आपल्याला नक्कीच आवडेल.
3/8
'ऑटो शंकर' ही वेब सिरीज सत्य घटनेवर आधारीत आहे. 1985 ते 1995 या काळात चेन्नई शहरात सिरीयल किलरने दहशत माजवली होती. 6 लोकांची हत्या केली होती.
4/8
या सिरीजला आयडीबीकडून 6.8 रेटिंग मिळाले आहे. या भयानक सिरीजचं दिग्दर्शन रंगा यांनी केलं आहे. या सिरीजमध्ये अप्पानी सारथने मुख्य भूमिका साकारली आहे. या व्यतिरिक्त सरन्या रवि, अर्जून चिदम्बरम कथिरावण, देव बाबू आणि वसुधा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
5/8
या सिरीजमध्ये गौरी शंकर हे पात्र ऑटो ड्रायव्हर असतो. तो पत्नी सुमति आणि मुलासोबत राहत असतो. त्याची परिस्थिती बिकट असते. 1980 साली तो गुन्हेगारी जगतात प्रवेश करतो.
6/8
त्याने दारुसह वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालवले, तसेच अनेकांची हत्याही केली. 1985 ते 1995 या काळात त्याने सहा जणांची हत्या केली होती. 1988 साली त्याला अटक झाली.
7/8
न्यायालयाने त्याला फाशीची सुनावली. 1995 साली शंकरला फाशी देण्यात येते. या वेब सिरीजमध्ये शंकरच्या आयुष्यातील विविध पैलू पाहायला मिळतात. त्याच्या आयुष्याची सुरुवात ते गुन्हेगारी विश्वाकडे तो कसा वळाला, हे या वेब सिरीजमधून प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
8/8
10 भागांची ही वेब सिरीज आपल्याला हादरवून सोडेल. जुन्या मद्रासमधील क्राइमचं वास्तव या वेब सिरीजमध्ये ठळकपणे मांडले गेले आहे. ही वेब सिरीज आपल्याला तामिळ, कन्नड, हिंदी, तेलुगु आणि मल्याळम भाषांमध्ये पाहता येईल.
Published at : 02 May 2026 03:25 PM (IST)