Shivpratap Garudjhep : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा थेट आग्र्याच्या किल्ल्यातून; 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटात अमोल कोल्हेंची प्रमुख भूमिका
अभिनेते अमोल कोल्हे यांच्या 'शिवप्रताप गरुडझेप' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे.
आग्र्यातल्या लाल किल्ल्यात चित्रित होणारा 'शिवप्रताप गरुडझेप' हा पहिला मराठी चित्रपट आहे.
'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटात अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत
'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटाबद्दल एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमोल कोल्हे यांनी सांगितलं की, 'केवळ मुघलच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानला स्वाभिमान काय असतं हे महाराजांनी दाखवून दिलं. कलाकार म्हणून या वास्तुत, या पेहरावात पाऊल टाकायला मिळणं हे माझं परमभाग्य आहे.'
अमोल कोल्हे म्हणाले, 'महाराष्ट्रातला पर्यटक मुंबईतून औरंगाबाद अजंठा वेरूळ लेणी पाहायला जातो. त्याला महाराजांच्या किल्ल्यांकडे कसं वळवता येईल याचा विचार झाला पाहिजे. आग्र्यातल्या लाल किल्ल्यातदिसणारी पर्यटकांची रीघ आपल्या किल्ल्यांकडे का दिसत नाही? '
लाला किल्ल्याबाबत अमोल कोल्हे म्हणाले,'लाल किल्ल्याच्या भिंतींना बोलता येत असतं तर अमोल कोल्हे सोडून द्या पण जिरेटोप आणि कवड्यांची माळ पाहून थरारल्या असत्या.'