Shehnaaz Gill : आपल्या संघर्षाबद्दल सांगताना शहनाज म्हणते..
स्वतःला ‘पंजाबची कतरिना कैफ’ म्हणत अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) हिने ‘बिग बॉस 13’च्या (Bigg Boss 13) घरात एन्ट्री घेतली होती.(photo:shehnaazgill/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App‘बिग बॉस 13’मुळे शहनाझ गिल प्रचंड चर्चेत आली होती. या शोमधून तिला प्रचंड मोठी फॅन फॉलोइंग मिळाली होती.(photo:shehnaazgill/ig)
अभिनेत्री सोशल मीडियावरही अभिनेत्री प्रचंड लोकप्रिय आहे. नुकतंच तिने एका मुलाखतीत ‘बिग बॉस 13’नंतर आपलं आयुष्य कसं बदललं, यावर भाष्य केलं आहे.(photo:shehnaazgill/ig)
आपल्या संघर्षाबद्दल सांगताना शहनाज म्हणते, ‘मी माझ्या आयुष्यात सगळं काही खूप मेहनतीने कमावलं आहे. आयुष्यात वेळे आधी आणि सहज कोणतीच गोष्ट मिळत नाही. एखादी गोष्ट जर लवकर मिळाली, तर ती लवकर नाहीशी देखील होते. मी आतापर्यंत खूप मेहनतीने काम केलं. यापुढेही असंच मेहनतीने काम करेन. बिग बॉसनंतर माणूस म्हणून मी आजही तशीच आहे. फक्त माझं व्यवहार ज्ञान आता बरंचस वाढलं आहे. गोष्टी कशा करव्यात हे मी आता शिकून घेतलं आहे. मी तेव्हाही बेस्ट होते आणि आताही बेस्टच आहे.’(photo:shehnaazgill/ig)
अभिनेत्री शहनाज गिल ही पंजाबी मनोरंजन विश्वात प्रचंड सक्रिय आहे. आता बॉलिवूडमध्ये आपले नाव कमावण्यासाठी शहनाज सध्या मुंबईत स्थायिक झाली आहे. मात्र, आजही ती आपल्या गावच्या मातीशी जोडलेली आहे. ती म्हणते, मी जेव्हा बोलते तेव्हा माझ्या बोलण्यातून पंजाबची झलक दिसते. आपण कुठेही जावो, आपली नाळ आपल्या मातीशी जोडलेली असली पाहिजे. मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे. मुंबईत येणं हे माझंही स्वप्न होतं, जे आता पूर्ण झालं आहे. इथे राहून मला आनंद होत आहे.(photo:shehnaazgill/ig)
‘बिग बॉस 13’च्या घरात शहनाजचं नाव अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत जोडले गेले होते. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते. मात्र, सिद्धार्थ शुक्ला याचे हृद्य विकारच्या झटक्याने निधन झाले. यानंतर शहनाज पूर्णपणे कोलमडून गेली होती. अभिनेत्री अजूनही त्या दुःखातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे.(photo:shehnaazgill/ig)