3 Idiots पासून ते Ek Tha Tiger पर्यंत, शाहरुख खानने नाकारले 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट; पाहा...
Shah Rukh Khan Rejected These Films: अभिनेता शाहरुख खानने त्याच्या करियरमध्ये अनेक चित्रपट रिजेक्ट केले आहेत, जे नंतर दुसऱ्या अभिनेत्यांना देण्यात आले आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले.
Shah Rukh Khan
1/6
निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी शाहरुख खानला '3 इडियट' या चित्रपटाची ऑफर दिली होती, परंतु तारखेच्या समस्येमुळे शाहरुख खान हा चित्रपट करू शकला नाही. नंतर आमिर खानला हा चित्रपट मिळाला.
2/6
'लगान' चित्रपटासाठी पहिली पसंती शाहरुख खानला होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जेव्हा शाहरुखला चित्रपटाची ऑफर आली तेव्हा त्याने नकार दिला आणि नंतर आशुतोष गोवारीकरला आमिर खानचे नाव सुचवले गेले.
3/6
शाहरुख खानला 'कहो ना प्यार है' या चित्रपटाची ऑफर आली होती, पण त्याने या चित्रपटालाही नकार दिला होता. यानंतर राकेश रोशनने आपला मुलगा हृतिक रोशनला या चित्रपटात कास्ट केले आणि तो सुपरहिट ठरला.
4/6
यशराज फिल्म्सने बनवलेल्या 'एक था टायगर' या चित्रपटासाठी देखील शाहरुख खानला विचारले गेले होते. पहिली पसंती होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कबीर खानला शाहरुख खानला मुख्य भूमिकेत कास्ट करायचे होते, परंतु त्यावेळी शाहरुख खान 'जब तक है जान' या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होता.
5/6
राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या 'रंग दे बसंती' या चित्रपटात आमिर खानने मुख्य भूमिका साकारली होती, परंतु या भूमिकेसाठी शाहरुख खानला पहिल्यांदा विचारण्यात आलं होतं हे फार कमी लोकांना माहीत असेल. मात्र, काही कारणास्तव त्याने चित्रपटात काम करण्यास नकार दिला.
6/6
शाहरुख खानने दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरसोबत 'स्वदेश'मध्ये काम केले होते. त्यांना 'जोधा अकबर' चित्रपटातही किंग खानला कास्ट करायचे होते, पण वैयक्तिक कारणांमुळे त्याने या चित्रपटाचा भाग होण्यास नकार दिला.
Published at : 13 May 2023 11:30 PM (IST)