भाड्याच्या घरात राहायचा, कपडे खरेदी करायलाही नव्हते पैसे; नशीबाचं नाणं चाललं अन् 300 कोटींचा मालक झाला

बॉलिवूड स्टार्सची लाईफस्टाईल आणि त्यांचं लग्झरी आयुष्य पाहून प्रत्येकालाच त्यांचा हेवा वाटतो. पण, सेलिब्रिटींसाठीही हा प्रवास सोपा नसतो, त्यापूर्वी त्यांना कठोर परिश्रम आणि संघर्ष करावा लागतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज आपण अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत. जो एकेकाळी भाड्याच्या घरात राहत होता. त्याने त्याच्या बालपणीही असाच काळ पाहिला आहे. जेव्हा त्याच्याकडे कपडे खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते. पण आज त्याच्या मेहनतीच्या आणि दमदार अभिनयाच्या जोरावर तो 300 कोटी रुपयांचा मालक बनला आहे. हे कोण आहे ते ओळखा...

फोटोत दिसणारा गोंडस मुलगा दुसरा-तिसरा कुणी नसून शाहीद कपूर आहे. जो खरंतर एक स्टारकीड आहे, पण तरीसुद्धा त्याला इंडस्ट्रीमध्ये इतर स्टारकिड्सना मिळणारे विशेषाधिकार मिळाले नाहीत.
अलिकडेच, शाहिद कपूरनं एका पॉडकास्टमध्ये राज शमानी यांच्याशी त्याच्या बालपणीच्या संघर्षांबद्दल सांगितलं. शाहिद म्हणाला, माझे वडील एक कॅरेक्टर कलाकार आहेत आणि आई कथ्थक नृत्यांगना होती. मी भाड्याच्या घरात राहिलो आहे. मी अनेक ऑडिशन्स दिल्यात, पण मला प्रिविलेज कधीच मिळालं नाही.
शाहीद कपूर म्हणाला, काही लोक बीएमडब्ल्यूमध्ये संघर्ष करतात, काहींचा प्रवास टॉप दिग्दर्शकांपासून सुरू होतो. पण, मी 250 ऑडिशन्स देऊन आलोय.
शाहीद कपूरनं असंही सांगितलं की, त्याचं बालपण संघर्षानं भरलेलं होतं. आज लोक म्हणतात की, शाहीदचा फॅशन सेन्स खूप चांगला आहे, पण जर तुम्ही माझे त्या काळातील कपडे पाहिले तर, तुम्ही माझ्यावर हसाल. माझ्याकडे कपडे खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, शाहीद कपूर आज आपल्या मेहनतीच्या जोरावर 300 कोटी रुपयांची संपत्तीचा मालक बनला आहे.
शाहिद कपूर एका चित्रपटासाठी सुमारे 20 ते 30 कोटी रुपये घेतो.
दरम्यान, शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट 31 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो पूजा हेगडेसोबत दिसणार आहे.