Pathaan : शाहरुखचा 'पठाण' आता घरबसल्या पाहा; जाणून घ्या कोणत्या ओटीटीवर होणार रिलीज...
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या 'पठाण' या सिनेमाने सिनेमागृहात सात आठवडे पूर्ण केले असून या सिनेमाची क्रेझ अद्याप कायम आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
येत्या 22 मार्चला 'पठाण' हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.
'पठाण' हा सिनेमा ओटीटीवर हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.
'पठाण' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सिद्धार्थ आनंदने सांभाळली आहे.
शाहरुखचा 'पठाण' हा सिनेमा रिलीज होण्याआधीपासूनच रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.
शाहरुखच्या 'पठाण'ने भारतात 522 कोटींची कमाई केली आहे.
'पठाण' या सिनेमाने जगभरात 1055 कोटींचा गल्ला जमवला आहे.
'पठाण' या सिनेमाच्या यशानंतर निर्मात्यांनी आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे.
आता उद्यापासून शाहरुखचा 'पठाण' सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.