PHOTO : 'रिस्क है तो इस्क है'... Scam 1992मध्ये हर्षद मेहतांच्या भूमिकेत दिसलेला प्रतिक गांधी आहे तरी कोण?
'रिस्क है तो इश्क है' स्कॅम 1992 (Scam 1992) मधील हा डायलॉग... स्कॅम 1992 या वेब सीरीजमधील. (@pratikgandhiofficial/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्कॅम 1992 ही वेब सीरिज लोकांपर्यंत पोहोचली ती प्रतीक गांधीच्या अभिनयामुळे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. (@pratikgandhiofficial/Instagram)
स्कॅम 1992 मध्ये प्रतिकने स्टॉक ब्रोकर हर्षद मेहता यांची भूमिका साकारली होती. (@pratikgandhiofficial/Instagram)
या भूमिकेमुळे प्रतिक एका रात्रीत यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपल्या कामाची कधी एवढी दखल घेतली जाईल, याचा विचारही प्रतिकने कधी केला नव्हता. (@pratikgandhiofficial/Instagram)
एका मुलाखतीत बोलताना प्रतीक गांधीने आपल्या स्ट्रगलची कहाणी सांगितली आहे. मी चौथीत होतो त्यावेळी मी पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्म केलं होतं. तेव्हापासूनच मला अभिनयाची आवड निर्माण झाली होती. वडिलांनी मला सपोर्ट केला, पण त्यांचं म्हणणं होतं की, आधी डिग्री घे, त्यानंतर जे करायचं आहे ते कर. मग मी इंजिनिअरिंग केलं., असं प्रतिक गांधीने सांगितलं. (@pratikgandhiofficial/Instagram)
इंजिनियरिंग करता करता प्रतीक अनेक छोट्या नाटकांमध्ये काम करत होता. कारण त्याचं खरं प्रेम अभिनयावर होतं, असंही तो सांगतो. (@pratikgandhiofficial/Instagram)
मी मुंबईत आलो. काही महिने खूप संघर्ष करावा लागला. 2006 मध्ये सूरतमध्ये पूर आला, त्यामध्ये आमचं घर वाहून गेलं. माझं संपूर्ण कुटुंब मुंबईत आलं. यादरम्यान, माझं लग्नही झालं. 5 लोकांचं कुटुंब वन बीएचके फ्लॅटमध्ये राहत होतं. मी फुल टाइम जॉब करत होतो. परंतु, अशा परिस्थितही दोन तासांचा वेळ काढून मी नाटकाचा सराव करत होतो., असं प्रतिक बोलताना म्हणाला. (@pratikgandhiofficial/Instagram)
स्कॅम 1992 मध्ये काम केल्यानंतर माझ्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी मिळाली. अनेकजण आता माझा लीड अॅक्टर म्हणून विचार करत आहेत. कारण 36व्या वर्षी मी रिस्क घेतली कारण रिस्क है तो इश्क है. , असंही प्रतीकनं बोलताना सांगितलं. (@pratikgandhiofficial/Instagram)
(@pratikgandhiofficial/Instagram)