Sara Ali Khan: काहींनी केलं ट्रोल तर काहींनी केलं कौतुक; साराच्या या लूक बद्दल तुम्हाला काय वाटतं?
बॉलिवूडमध्ये काम करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. स्टार किड्ससाठी हा मार्ग तुलनेनं सोपा असतो. हिंदी सिनेसृष्टीतील अल्पावधीतच स्वत:ला सिद्ध करणं हे खूप आव्हानात्मक असतं. पण बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने (Sara Ali Khan) अल्पावधीतच स्वत:ला सिद्ध केलं आहे. (PC:saraalikhan95/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसारा अली खानने 'केदारनाथ' (Kedarnath) या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं.(PC:saraalikhan95/IG)
या सिनेमात ती सुशांत सिंह राजपूतसोबत झळकली होती. पहिलाच सिनेमा यशस्वी ठरल्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही.(PC:saraalikhan95/IG)
'केदारनाथ'नंतर रोहित शेट्टीच्या 'सिम्बा' या सिनेमात ती झळकली. हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरला. (PC:saraalikhan95/IG)
सारा व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत साराचं नाव जोडलं गेलं आहे. कार्तिक आर्यनसोबतही तिचे नाव जोडले गेले होते. सारा शुभमन गिलला डेट करत असल्याची चर्चाही रंगली होती. वीर पहाड़िया, हर्षवर्धन कपूर आणि ईशान खट्टरसोबतही तिचे नाव जोडले गेले आहे.(PC:saraalikhan95/IG)
मीडिया रिपोर्टनुसार, सारा अली खान एका सिनेमासाठी पाच ते सात कोटी रुपयांचं मानधन घेते. (PC:saraalikhan95/IG)
सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सारा खूपच जाड लठ्ठ होती. पण नियमित व्यायाम आणि सकस आहार करत तिने आपलं वजन नियंत्रणात आणलं.(PC:saraalikhan95/IG)
साराने नुकताच तिचा एक खास लूक शेअर केलाय ज्यात ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय,(PC:saraalikhan95/IG)
स्मोकी ब्लॅक इये मेकअपसह न्यूड लिप्सटिकमध्ये साराचा हा लूक खूपच खुलून दिसत आहे.(PC:saraalikhan95/IG)
साराच्या या लूकवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत, काहींना हा लूक खूपच आवडला आहे तर काही साराला ट्रोल देखील करत आहेत.(PC:saraalikhan95/IG)