Sara Ali Khan : लग्न कोणाशी करणार? सारा म्हणाली..
अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) नं कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. सारा अली खान सध्या तिच्या आगामी 'अतरंगी रे' चित्रपटामुळे चर्चेत असून प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसारा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), रणवीर सिंह (Ranveer Singh), सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput), कार्तिक आर्यन (Kartik Aryan) यांच्यासह अनेक अभिनेत्यांसोबत चित्रपटात झळकली आहे.
बॉलिवूडमध्ये सध्या लगीनघाई सुरु आहे. अशातच आता अभिनेत्री सारा अली खाननं लग्नाबाबत मोठं गुपित उघड केलं आहे. सारानं सांगितलं आहे की, ती कुणाबरोबर लग्न करणार आहे
सारानं एका मुलाखतीत सांगितलं आहे की, तिला असा नवरा हवा आहे जो तिच्यासोबत आईच्या घरी येऊन राहू शकतो.
सारानं म्हटलं की, तिची आई अमृता सिंग (Amruta Singh) नं तिला सिंगल पॅरंट असूनही खूप चांगल्याप्रकारे सांभाळलं. त्यामुळे तिचा आईसोबतचा जिव्हाळा जास्त आहे.
सारानं पुढे सांगितलं की, तिची आई तिला प्रत्येक गोष्टीत मदत करते. कसे कपडे घालावे, त्यासोबत कोणत्या बांगड्या, इअररिंग्स घाल्याव्यात या सर्व गोष्टींमध्ये आई अमृता तिला मदत करते. त्यामुळे सारा आईपासून दूर राहू शकत नाही. म्हणून साराला असा नवरा हवाय जो तिच्यासोबत आईच्या घरी येऊन राहील.