Santosh Juvekar : 'मी अक्षय खन्नाकडे पाहिलंही नाही', 'त्या' वक्तव्यानंतर संतोष जुवेकर प्रचंड ट्रोल, नेटकऱ्यांकडून मीम्सचा पाऊस
Santosh Juvekar : छावा सिनेमाबाबत त्या वक्तव्यानंतर संतोष जुवेकर प्रचंड ट्रोल, नेटकऱ्यांकडून मीम्सचा पाऊस
Photo Credit - abp majha reporter
1/9
छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावर आणि बलिदानावर आधारित असलेल्या छावा या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.
2/9
अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमावर छप्परफाड कमाई केली.
3/9
दरम्यान, या सिनेमात मराठी अभिनेता संतोष जुवेकर याने देखील रायाची भूमिका बजावली होती.
4/9
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाने कमाईच्या बाबतीत 600 कोटींचा टप्पा पार केलाय.
5/9
सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर संतोष जुवेकर याने काही मुलाखतीही दिल्या.
6/9
मात्र, एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय.
7/9
मी अक्षय खन्ना समोर असून सुद्धा त्याच्याशी बोललो नाही, असं वक्तव्य संतोष जुवेकर यांनी केलं होतं.
8/9
या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर अनेक मीम्स बनवले आहेत.
9/9
या मीम्समधून नेटकरी संतोष जुवेकरला ट्रोल करताना दिसत आहेत.
Published at : 12 Mar 2025 07:49 PM (IST)