प्रेक्षकांसाठी खुशखबर! सनम तेरी कसम चित्रपटाचा सिक्वेल येणार; 10 वर्षांनंतर मेकर्सची मोठी घोषणा
Sanam Teri Kasam Makers Announce Part 2: सनम तेरी कसम चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण. निर्मात्यांनी सनम तेरी कसम 2 ची अधिकृत घोषणा केली.

Sanam Teri Kasam Makers Announce Part 2
1/8
Sanam Teri Kasam Makers Announce Part 2: 2016 साली सनम तेरी कसम प्रेक्षकांच्या भेटीला आला, पण या सिनेमाची चित्रपटगृहात फारशी जादू चालली नाही.
2/8
सनम तेरी कसम सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. पण नंतर या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
3/8
हा सिनेमा चित्रपटगृहात री- रिलीज करण्यात आला. या चित्रपटाने पुन्हा प्रेक्षकांची मने जिंकल्याचं पाहायला मिळालं.
4/8
सनम तेरी कसम या चित्रपटाला 5 फेब्रुवारी रोजी 10 वर्षे पूर्ण झाली. या सिनेमाचे निर्माते दीपक मुकुट यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली.
5/8
दीपक मुकुट यांनी एक इमोशनल पोस्ट शेअर केली. त्यांनी या पोस्टमधून, लवकरच या सिनेमाचा सिक्वेल सनम तेरी कसम 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिली.
6/8
या पोस्टमध्ये दीपक मुकुट यांनी म्हटलं की,"लहानपणापासूनच फिल्ममेकिंग हे माझं स्वप्न होतं. मला एक असा सिनेमा तयार करायचा होता, ज्यामध्ये एक सुंदर इमोशनल कथा असेल. माझं हे स्वप्न सनम तेरी कसमच्या माध्यमाने पूर्ण झालंय".
7/8
हर्षवर्धन राणे आणि मावरा होकेन स्टारर सनम तेरी कसम सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. मात्र, री-रिलीजनंतर हिट ठरला. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या काळजात घर केलं.
8/8
सनम तेरी कसमचा दुसरा पार्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या दुसर्या पार्टसाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
Published at : 07 Feb 2026 02:33 PM (IST)