Arpita Farms: जिमपासून घोडेस्वारीपर्यंत... सलमान खानचे फार्म हाऊस आहे फाइव्हस्टारपेक्षा छान
salman
1/5
बॉलिवूड स्टार्सची जीवनशैली अनेकदा चर्चेत असते. ते काय खातात, कुठे राहतात, काय परिधान करतात, या सर्व गोष्टी चाहत्यांना जाणून घ्यायच्या असतात. चला तर पाहू बॉलीवूडच्या दबंग खान म्हणजेच सलमान खानच्या फार्म हाऊसचे खास फोटो.
2/5
सुपरस्टार सलमान खानचे हे फार्म हाऊस पनवेल, नवी मुंबई येथे आहे. सलमान अनेकदा त्याचे कुटुंब आणि मित्रांसोबत सुट्टी साजरी करतो. अर्पिता फार्म्स असे या फार्म हाऊसचे नाव आहे. जे सुमारे 150 एकरमध्ये पसरलेले आहे
3/5
या फॉर्म हाऊसमध्ये एक जिम सुद्धा आहे. मुंबईपासून सुमारे 2 तासांच्या अंतरावर असलेल्या या फार्म हाऊसमध्ये भाईजानने त्याच्या आवडीच्या गोष्टींची विशेष काळजी घेतली आहे, जसे की घोडेस्वारी, बाईक चालवणे आणि एटीव्ही ड्रायव्हिंग, भरपूर जागा राखीव आहे.
4/5
त्याचबरोबर येथे एक स्विमिंग पूलही आहे. सलमान खाननेही या फार्म हाऊसमध्ये पाळीव प्राण्यांसाठी बरीच जागा सोडली आहे.
5/5
सलमानला हे ठिकाण इतके आवडते की, त्याने त्याच्या सुपरहिट चित्रपट 'बजरंगी भाईजान' आणि ट्यूबलाइटसह इतर चित्रपटांचे काही भाग येथे शूट केले आहेत .
Published at : 25 Nov 2021 02:36 PM (IST)