Salman Khan : सलमान खान मुंबईत सुरू करणार अत्याधुनिक सुविधा असलेलं 19 मजली हॉटेल
सलमान खान आता मुंबईतील वांद्रे येथील कार्टर रोडवर 19 मजली हॉटेल बांधणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलमान खान कार्टर रोडवरील सी-फेसिंग प्लॉटवर हॉटेल बांधण्याचा विचार करत आहे.
सलमानच्या हॉटेलच्या आराखड्याला बीएमसीनेदेखील मंजुरी दिली आहे.
सलमान खानच्या 19 मजली हॉटेलची उंची 69.9 मीटर असेल.
सलमानच्या हॉटेलचा पहिला आणि दुसरा मजला कॅफे आणि रेस्टॉरंटसाठी, तिसरा मजला जिम आणि जलतरण तलावासाठी तर चौथा मजला सर्व्हिस फ्लोअरसाठी तर पाचवा आणि सहावा मजला कन्व्हेन्शन सेंटरसाठी असेल.
तसेच सलमानच्या हॉटेलचे सात ते 19 मजल्यापर्यंतचे मजले हॉटेल वापरासाठी असतील.
सलमानला नुकतीच 'टायगर 3'च्या सेटवर गंभीर दुखापत झाली आहे.
सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला.
सलमान खानचे 'किक 2', 'टायगर 3' हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.