Saisha Shinde: वर्षभरापूर्वी स्वप्निलचा 'सायशा' झाली, अन्..
Saisha Shinde : सायशा शिंदे हे नाव गेल्या एक महिन्याभरात सर्वांच्या तोंडी आहे. मिस युनिव्हर्स हरनाज संधूनं जो डिजायनर ड्रेस घालून किताब मिळवला तो शायशानं डिजाईन केला होता. (photo: officialsaishashinde/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिचं जगभरातून त्याबद्दल कौतुक झालं. सायशा सेलिब्रेटी होतीच पण ती नव्यानं लाईमलाईटमध्ये आली. सायशा ट्रांसवुमन आहे. आधीची स्वप्निल म्हणजेच आताची सायशा. वर्षभरापूर्वी स्वप्निलचा सायशा झाली. आता ती फॅशन इंडस्ट्रीमधलं मोठं नाव आहे.(photo: officialsaishashinde/ig)
गेल्या काही दिवसांपासून स्वप्निलचा सायशा होताना नक्की काय काय घडलं याबद्दल खुप इमोशनल आणि प्रचंड प्रभावी इंस्टापोस्ट सायशाने शेअर केली आहे. (photo: officialsaishashinde/ig)
वर्ष सरताना सायशानं केलेली पोस्ट फक्त ट्रान्सजेन्डरलाच नव्हे तर माणूस म्हणून जन्माला आल्याला प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे. आपल्या पोस्टमध्ये सायशा म्हणते, ''स्वप्निलला नेहमीच आपल्या शरीराबद्दल न्यूनगंड होतं. तो मस्क्युलर नाही म्हणून तो नेहमी टिशर्ट घालून स्विमिंगपूलमध्ये उतरायचा. मग भिजलेल्या अंगाला टिशर्ट चिटकायचं, त्यातून आपलं स्त्रियांसारखं उभारलेलं शरीर दिसू नये म्हणून तो मग फक्त डोकंच पाण्याबाहेर काढायचा. त्यामुळं पूल पार्टी किंवा मग पूल ही संकल्पनाच नकोशी वाटायची. प्रत्येक स्विमिंगपूलवाला टिशर्ट घालून पाण्यात उतरु देईलच असं नव्हतं. त्यामुळं हे आनंदाचे क्षण इच्छा असूनही अनुभवायला मिळायचे नाहीत. (photo: officialsaishashinde/ig)
सायशा पुढे म्हणाली: माझं शरीर ‘मापा’त होतं असं नाही. पण ब्रा आणि डेनिम घालून एकदम कसं सुटसुटीत वाटलं. माझी ब्रेस्ट, माझं पोट सर्व काही दिसत होतं. माझ्या मनात लाजरेपणाची किंवा असुरक्षेची भावनाच आली नाही. ट्रान्सजेन्डर वुमन होऊ वर्षे झालं. आता मी मुक्तपणे श्वास घेऊ शकते. मी सर्वांचे आभार मानते आणि महत्त्वाचं म्हणजे स्वताला थँक्यू म्हणावसं वाटतंय.'' (photo: officialsaishashinde/ig)
सायशाची ही पोस्ट त्या असंख्य पुरुषांच्या शरीरात अडकलेल्या तिच्यासाठी इन्स्पिरेशन आहे. नेटफ्लिक्सला नुकताच एक सिनेमा पाहिला. चंडीगड करे आशिकी (2021).आयुषमान खुराना आणि वाणी कपूर आहेत त्यात. वाणी कपूर यात ट्रान्सवुमन झालीय. पंजाब-हरियाणासारख्या राज्यांमधल्या सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा बननं हेच मोठ्ठ काम झालंय. (photo: officialsaishashinde/ig)